घाटकोपरमध्ये सात वर्षांच्या मुलीला फूस लावून लैंगिक अत्याचार! वडापाव आणायला गेलेल्या मुलीवर सीरियल मॉलेस्टरचा डोळा

Ghatkopar Girl Molestation : सात वर्षांच्या या मुलीला एका निर्जनस्थळी नेऊन आरोपीनं तिचा लैंगिक अत्याचार केला

घाटकोपरमध्ये सात वर्षांच्या मुलीला फूस लावून लैंगिक अत्याचार! वडापाव आणायला गेलेल्या मुलीवर सीरियल मॉलेस्टरचा डोळा
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 7:43 AM

मुंबई : घाटकोपरमध्ये (Ghatkopar) एका सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (girl molest) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटकही केली. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत ही कारवाई (Accused arrested) केली. लैंगिक अत्याचारप्रकरणी तक्रार आल्यानंतर तातडीने पोलिसांनी आठ टीम तयार केल्या. त्यानंतर फरार संशयित आरोपीचा शोध घेत पोलिसांनी अटकेची कारवाई केलीय. अटक करण्यात आलेला आरोपी हा सीरियल मॉलेस्टर असल्याचंही उघड झालंय. अटकेतील आरोपीविरोधात याआधीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणी आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे.

वडपाव आणायला गेली होती आणि..

मुंबईतील सात वर्षांच्या मुलीवर घाटकोपरमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. सात वर्षांच्या या मुलीला एका निर्जनस्थळी नेऊन आरोपीनं तिचा लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी वडापाव आणण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती. तेव्हा आरोपीनं सात वर्षांच्या पीडित मुलीला फूस लावली. त्यानंतर तिला एक दुर्गम ठिकाणी नेलं आणि तिच्यासोबत अत्याचार करुन आरोपी फरार झाला.

सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधा घाटकोपरच्या झोन सात अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीनं आठ पथकं फरार आरोपीच्या शोधासाठी तैनात केली होती. यानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आतच आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं ना सचिन अनंत शमा आहे. त्याचं वय 32 वर्ष आहे.

सीरीयल मॉलेस्टर…

लैंगिक अत्याचार करणारा 32 वर्षीय आरोपी सचिन हा टेम्पो चालक आहे. तो सीरियल मॉलेस्टर असल्याची माहिती पोलीसांच्या तपासातून पुढे आली आहे. झोन सातचे डीसीती प्रशांत कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन शमा यांच्यावर याआधीही विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल होते. आता सचिनला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जाते आहे.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.