मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला (Jogeshwori East) असलेल्या रामवाडी भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षांच्या तरुणीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, मृत्यूआधी तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटनं अनेकांना धक्का दिला आहे. आपला मोबाईलचा पासवर्ड तिनं सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) सांगितला असून तिच्या आत्महत्येची नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव जान्हवी विजय चव्हाण असं आहे. ‘पप्पा यात सर्व पुरावे आहेत, त्याला सोडू नका’ असं जान्हवीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सोबत तिनं आपल्या मोबाईलचा पासवर्ड दिली आहे. दरम्यान, या घटनेनं जोगेश्वरीतील रामवाडी (Ramwadi, Jogeshwori) परिसर हादरुन गेला आहे. एका तरुणालाही या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय.
विजय चव्हाण हे जोगेश्वरीतल्या रामवाडीत राहातात. पालिकेच्या जल विभागात फिटर म्हणून काम करणारे विजय चव्हाण यांच्या पत्नीचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न लावून देण्यात आलं होतं. मोठा मुलगा लग्नानंतर विरारला राहत होता. दरम्यान, त्यांना एक मुलगीही होती. मोठ्या मुलीच्या लग्नानंतर मुलगी घरात बराचवेळ एकटीच असायची. दरम्यान, पत्नीच्या निधनानंतर आता मुलीनंही आत्महत्या केल्यानं चव्हाण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
घरात बराच वेळ एकटी असलेल्या जान्हवीचं एका मुलावर प्रेम होतं. या मुलाचं नाव निखिल असून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जान्हवी ही अंधेरीच्या कोविड लसीकरण केंद्रात अटेडंट म्हणून काम करत होतं. वडील कामानिमित्त सतत बाहेर असलेल्या जान्हवीचे निखिलसोबत प्रेमसंबंध जुळले होते. अनेकदा ती फोनवरुन त्याच्याशी संपर्कात असायची.
दरम्यान, जान्हनीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये निखिलनं आपल्या भावनांशी खेळ केला असल्याचा दावा केला आहे. घरच्यांचं कारण देत त्यानं मला सोडलं, असं लिहीत नैराश्य आलेल्या जान्हवीनं जीव दिल्याचं सुसाईट नोटमधून समोर आलं आहे. चव्हाण यांच्या घरी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यात त्यांना जान्हवीची सुसाईड नोट सापडली होती. त्यात जान्हवीनं निखिलसोबत त्याच्या बहिणीचंही नाव लिहिलं होतं. त्यांनी त्रास दिला असल्याचा आरोप जान्हवीनं केलाय. दरम्यान, आपल्या मोबाईलचा पासवर्ड देत त्यास सगळे पुरावे आहेत, असंही सुसाईट नोटमध्ये जान्हनीनं म्हटलंय.
रविवारी जान्हवीचे वडील बाहेर गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ते घरी परतले. जेव्हा ते घराबाहेर पोहोचले तेव्हा खिडकीतून त्यांना जे दिसलं, त्यांनं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानं वडील विजय चव्हाण यांना मोठा हादरा बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूची लोकं जमा झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून जान्हवीला रुग्णालयात नेलं. पण तिला मृत घोषित करण्यात आलं.
आई नसल्यानं, वडील कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असल्यानं आणि भाऊ लग्नानंतर विरारला राहायला गेल्यामुळे जान्हवी एकटी पडल्याचं तिच्या सुसाईड नोटमध्ये दिसून आलं आहे. सॉरी पप्पा मी तुम्हाला एकटं सोडून गेली. मला जायचं नव्हतं. पण आता सहन होतं नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं. त्याच्याशिवाय मला दुसरं माझं कुणी नव्हतं. पण तो माझ्या भावनांशी खेळला. आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या. पप्पा माझ्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे आहेत. सोडू नका त्याला, असं लिहीलंय. सध्या पोलिस याप्रकरणी निखिलची चौकशी करत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना
कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!
चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप