DHFL Scam : धीरज वाधवान यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे जेजे रुग्णालयाला निर्देश

वाधवान हे मागील 15 महिन्यांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना खाजगी रुग्णालयातून सरकारी जेजे रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाधवान यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे.

DHFL Scam : धीरज वाधवान यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे जेजे रुग्णालयाला निर्देश
राजलक्ष्मी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये फ्रॉड ट्रेडिंगImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:05 AM

मुंबई : बहुचर्चित डीएचएफएल (DHFL) घोटाळ्यातील सहभागाचा आरोप असलेले डीएचएफएलचे प्रवर्तक धीरज वाधवान(Dheeraj Wadhwan) यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारी जेजे रुग्णालयाला दिले आहेत. जेजे रुग्णालय वाधवान यांचा जो वैद्यकीय अहवाल सादर करेल, त्याआधारे न्यायालय वाधवान यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. वाधवान यांनी त्यांना खासगी रुग्णालयातून जेजे रुग्णालयात हलवण्याचे निर्देश देणाऱ्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी केली जात आहे. (JJ Hospital directed to submit medical report of Dheeraj Wadhwan)

वाधवान यांच्यावर 15 महिने खाजगी रुग्णालयात उपचार

वाधवान हे डीएचएफएलमधील कथित घोटाळ्यातील आरोपी आहेत. येस बँक प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने 2020 मध्ये धीरज वाधवान यांना अटक केली होती आणि त्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर वाधवान हे मागील 15 महिन्यांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना खाजगी रुग्णालयातून सरकारी जेजे रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाधवान यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे.

खाजगी रुग्णालयात ठेवण्याची गरज नव्हती; सीबीआयचा दावा

विशेष सीबीआय न्यायाधीशांनी गेल्या महिन्यात तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना वाधवान यांना सरकारी जेजे रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी विशेष न्यायालयाने वाधवान यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात कसे हलवण्यात आले, याबाबत अधीक्षकांकडून स्पष्टीकरणही मागितले होते. सीबीआय न्यायालयाने सीबीआयच्या याचिकेवर हा निर्णय दिला होता. वाधवान यांना 15 महिने खाजगी रुग्णालयात ठेवण्याची कोणतीही वैद्यकीय गरज नव्हती, असे म्हणणे सीबीआयने विशेष न्यायालयापुढे मांडले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने वाधवान यांना जेजे रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे वाधवान यांना मोठा झटका बसला होता.

खाजगी रुग्णालयाने शस्त्रक्रियेचा दिला होता सल्ला

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नियुक्त केलेल्या दुसर्‍या न्यायालयाने वाधवान विरुद्ध ईडी खटल्यातील याचिकेवर सुनावणी केली. यावेळी पीएमएलएच्या न्यायालयासमोर सांगण्यात आले की, खाजगी रुग्णालयाने वाधवान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सूचित केले होते. वाधवान यांना नाकाचा तीव्र त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, असे खाजगी रुग्णालयातर्फे सांगण्यात आले होते. याकडे कनिष्ठ न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. (JJ Hospital directed to submit medical report of Dheeraj Wadhwan)

इतर बातम्या

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पुन्हा सीआरपीएफ जवानांवर गोळीबार, एक जवान शहिद

Lalu Prasad Yadav : लालूंच्या अडचणीत पुन्हा मोठी भर; जामीनावर सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.