Kalyan Crime | आईने ओळखली चप्पल आणि ‘तो’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात, चोरुन घरात शिरुन महिलेवर हल्ला का?

कल्याणमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर घरात घुसून चाकूचा हल्ला करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडीत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. हल्लेखोर आरोपी पळून गेला होता. पण पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत.

Kalyan Crime | आईने ओळखली चप्पल आणि 'तो' अडकला पोलिसांच्या जाळ्यात, चोरुन घरात शिरुन महिलेवर हल्ला का?
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 10:00 PM

सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 9 ऑक्टोबर 2023 : कल्याण डोंबिवली परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर नागरिकांना घरात राहणंही मुश्किल झालेलं आहे. कारण गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण खडकपाडा परिसरात एका व्यक्तीने नऊ महिने आधी उत्तर प्रदेश मधल्या 20 वर्षीय तरुणीशी लग्न केले. त्याने कल्याण पश्चिमेतील एका चाळीत आपला लग्नाचा सुखी संसार मांडला.

पीडितेचा पती हा एका बेकरीत काम करतो. बेकरीच्या कामासाठी तो कुठल्याही वेळी बेकरीत जातो. अशाचप्रकारे तो काल सायंकाळी घराच्या काही अंतरावर असलेल्या त्याच्या बेकरीत कामासाठी गेला. यावेळी त्याची पत्नी ही घरात एकटी असताना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घराच्या खिडकीतून एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. त्याने तिच्या गळ्यावर आणि तळहातावर चाकूने सपासप वार केले.

आरोपी हल्ला करुन फरार

जखमी अवस्थेत पीडितेने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून परिसरात नागरिकांनी तिच्याजवळ धाव घेतली. यावेळी तिच्या नवऱ्याला माहिती देण्यात आली. तुझ्या पत्नीला कुणीतरी मारहाण करत असल्याची माहिती तिच्या पतीला स्थानिकांनी दिली. पती हा घरी पोहोचेपर्यंत हल्ला करणारा हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

घरात जखमी अवस्थेत पडलेल्या पत्नीला त्याने उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीडिता सध्या गंभीर अवस्थेत असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली.

पंचनामादरम्यान पोलिसांना घराजवळ एक चप्पल आढळून आली. आजूबाजूला शोध घेतला असता एका महिलेने ही चप्पल तिच्या मुलाची असल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान आरोपी गंगाधर हा त्यावेळेस आपल्या दुचाकीने परिसरात आला होता. पण पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. यासंबंधी माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या 6 तासात मुस्क्या आवळ्याला आहेत.

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.