Kandivali Murder Suicide : कांदिवली हादरलं! प्रेमप्रकरणातून आईसह दोघा मुलींचा खून करुन ड्रायव्हरची आत्महत्या

Mumbai Murder News : शिवदयाळ सेन हा पेशाने ड्रायव्हर होता. त्याचं तिघांपैकी एकीसोबत प्रेमसंबंध होते.

Kandivali Murder Suicide : कांदिवली हादरलं! प्रेमप्रकरणातून आईसह दोघा मुलींचा खून करुन ड्रायव्हरची आत्महत्या
धक्कादायक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 11:40 AM

मुंबई : मुंबईच्या कांदिवली (Kandivali Murder case) भागातून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका इसमानं तिघा महिलांची चाकून भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत जीव दिलाय. कांदिवली स्टेशन जवळ असलेल्या एका इमारतीत चार मृतदेह आढळून आले होते. छिन्नविछिन्न आणि जखमी अवस्थेतील हे मृतदेह (Mumbai Murder Case) पाहून सगळेच हादरले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झालं असल्याचं उघड झालंय. आत्महत्या (Mumbai Suicide) करणारा हा एक ड्रायव्हर होता. तर तिघा महिलांची हत्या करण्यात आली होती. यातील एक आई असून इतर दोघीजणी तिच्या मुली होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

किरण दळवी, मुस्काळ दळवी, भूमी दळवी, अशी हत्या करण्यात आलेल्या तिघींची नावं आहेत. तर शिवदयाळ सेन यानं या तिघांचा आधी खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. धारदार शस्त्राने वार करुन शिवदयाळ सेन याने तिघींनी संपवलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जातोय.

प्रेमप्रकरणातून हत्याकांड

शिवदयाळ सेन हा पेशाने ड्रायव्हर होता. त्याचं तिघांपैकी एकीसोबत प्रेमसंबंध होते. ड्रायव्हरसोबतच्या प्रेमसंबंधाची माहितीत कुटुंबाला कळली. त्यातून सतत खटके उडत होते. अखेर या वादाला कंटाळून ड्रायव्हरने तिघींची हत्या केली, आणि नंतर गळफास घेत स्वतःही जीव दिला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुसाईड नोटही सापडली. तसंच एक धारदार शस्त्रही पोलिसांनी मृतदेह साडलेल्या ठिकाणावरुन जप्त केलंय.

हे सुद्धा वाचा

हत्या झालेल्यांची नावं पुढीलप्रमाणे

किरण दळवी

मुस्कान कळवी

भूमी दळवी

आत्महत्या करणाऱ्याचं नाव

शिवदयाळ सेन

या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी याप्रकरणी माहिती मिळतचा घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शताब्दी रुग्णालयाकडून आता या मृतदेहांचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट येण्याची पोलिसांना प्रतीक्षा आहे. त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.