मुंबई : फेसबुकवर मैत्री करुन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका भामट्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. कमलेश हरिराम सुतार उर्फ तनवीर (33) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला गुजरातमधील अहमदाबादमधून अटक केली. आरोपीने आणखी किती मुलींना प्रेमाच्या मोहात अडकवून त्यांची फसवणूक (Fraud) केली आहे, याचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत. आरोपी फेसबुकवर मस्त फोटो टाकून व्यावसायिक असल्याची बतावणी करायचा. फेसबुकवर आधी मुंबईतील हायप्रोफाईल मुलींशी मैत्री करायचा मग प्रेमाचे नाटक करून लग्नाच्या बहाण्याने लाखो रुपये उकळायचा. त्या मुलींकडून महागडे मोबाईल, भेटवस्तू, व्यवसायात तोटा झाल्याचे सांगून लाखो रुपये घेऊन पळून जात असे. (Kandivali police arrest accused of cheating on girls by befriending them on Facebook)
कांदिवली पोलिसांनी 26 एप्रिल रोजी एका तरुणाविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने याआधीच एका मुलीशी लग्न करून तिला तलाक दिला होता. त्यानंतर कांदिवली येथे राहणाऱ्या पीडित तरुणीशी फेसबुकवर मैत्री करून फसवणूक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर लग्नाच्या बहाण्याने आरोपीने आधी 80 हजाराचा मोबाईल फोन गिफ्ट घेतला. त्यानंतर दीड लाखाचा फोन गिफ्ट घेतला. तसेच व्यवसायातील नुकसान सांगून आरोपीने 55 लाख रुपयेही घेतले, असे पीडित मुलीने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितले. तरुणीने घर विकून आरोपीची इच्छा पूर्ण केली. आरोपीने तीन वर्षांपासून मॉडेलिंगही केले आहे. नंतर मुलीला समजले की आरोपी आधीच विवाहित आहे आणि त्याची पत्नी गरोदर आहे. यानंतर तरुणीने कांदिवली पोलिसात धाव घेत सर्व प्रकार कथन केला. मालवणी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी सांगितले. कांदिवली पोलिसांच्या तपास पथकाने कसून शोध घेत आरोपीला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करून 3 मे रोजी मुंबईत आणले. (Kandivali police arrest accused of cheating on girls by befriending them on Facebook)