Ketki Chitale : केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर 16 जूनला सुनावणी

केतकीने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात अनेक धर्म आणि नवबौद्धांबाबत मतं मांडली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वाती चितळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार केतकीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ketki Chitale : केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर 16 जूनला सुनावणी
केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 8:25 PM

मुंबई : फेसबुकवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट (Controversial Post) टाकल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडी (Judicial Custody)त असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला आजही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. केतकीचा जामीन अर्जावर आता 16 जून रोजी सुनावणी होणार आहे. अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात केतकीने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी केतकीने न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. आता 16 जून रोजी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यामुळे केतकीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

केतकीने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात अनेक धर्म आणि नवबौद्धांबाबत मतं मांडली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वाती चितळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार केतकीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेला 15 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर केले असता 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर ती अद्याप न्यायालयीन कोठडीतच आहे.

प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची केतकीच्या वकिलांची मागणी

केतकी चितळेवर जाणूनबुजून कारवाई होत असल्याचा दावा केतकी चितळेच्या वकिलांनी केला आहे. केतकी चितळेच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. केतकी चितळेवर नवी मुंबईमध्ये हल्ला झाला असताना देखील कोणतीही कारवाई मारेकऱ्यांवर होत नाही. यामागे कोणत्या तरी राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो. एकाच गुन्ह्यासंदर्भात 22 ठिकाणी एफआयआर नोंदवणे चुकीचे असल्याचेही केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी म्हटले आहे. (Ketki Chitales bail application in the controversial post case will be heard on June 16)

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.