सिग्नलवर पैसे मागण्याचा वाद, तृतीयपंथींनी एकाला भररस्त्यात भोसकलं
सिग्नलवर पैसे मागण्याच्या वादाततून दोन तृतीयपंथीने एका तृतीयपंथीला भोसकलं. मुंबईजवळ दहीसर परिसरात बुधवारी 28 जुलैला संध्याकाळी हा सर्व थरार झाला.
मुंबई : सिग्नलवर पैसे मागण्याच्या वादाततून दोन तृतीयपंथीने एका तृतीयपंथीला भोसकलं. मुंबईजवळ दहीसर परिसरात बुधवारी 28 जुलैला संध्याकाळी हा सर्व थरार झाला. पैसे मागण्याच्या वादातून चार तृतीयपंथींची वादावादी झाली. त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. या चारपैकी दोघांनी एका तृतीयपंथीवर थेट चाकूहल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील दहिसर पश्चिमेत एच एच,बी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुधीर फडके चौक आहे. दहीसर आणि बोरिवली दरम्यान असलेल्या राम मंदिर सिग्नलजवळ तृतीयपंथींच्या हद्दीवरुन राडा झाला. इथे 4 तृतीयपंथीचं सिग्नलवर पैसे मागण्यावरून भांडण झालं. या वादामध्ये दोन तृतीयपंथींनी एका तृतीयपंथीवर चाकूने हल्ला केल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या चाकूहल्ल्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
या घटनेची माहिती मिळताच रात्री 10:30 च्या सुमारास मोठ्या संख्येत तृतीयपंथी सुधीर फडके चौकाच्या सिग्नलवर जमा झाले. तृतीयपंथींनी गर्दी केल्यामुळे काही काळासाठी इथे ट्रॅफिक जाम झालं. मात्र मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला. या घटनेमध्ये मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अवघ्या 2 तासाच्या आत 2 तृतीयपंथींना अटक केली आहे.
संबंधित बातम्या
सुपारी, मर्डर सारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी, चाहत्यांकडून केडीएमटी बस स्टॉपवर वाढदिवसाचा बॅनर