दागिने घ्यायच्या म्हणून आल्या, सोन्याच्या 90 नथी घेऊन पळाल्या, चोरीचा CCTV व्हिडीओ पाहाच

बाजारपेठेत आलेल्या दोघा बुरखाधारी महिलांनी एका ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल 90 नथींवर डल्ला मारल्याची घटना भिवंडीत घडली आहे. दुकानाच्या काऊंटरवरील लाल रंगाच्या फोल्डर मध्ये लावून ठेवलेल्या 2 लाख 71 हजार रुपये किमतीच्या 90 नथींवर दुकानदाराचे लक्ष विचलित करून महिलांनी डल्ला मारला.

दागिने घ्यायच्या म्हणून आल्या, सोन्याच्या 90 नथी घेऊन पळाल्या, चोरीचा CCTV व्हिडीओ पाहाच
Bhiwandi Gold Jwellery Thift
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 1:25 PM

ठाणे : भिवंडीत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यास पायबंद घालण्यात भिवंडी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मागील काही दिवसांपूर्वी ज्वेलर्स दुकानात आलेल्या बुरखाधारी महिलांनी 32 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्यांवर डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बाजारपेठेत आलेल्या दोघा बुरखाधारी महिलांनी एका ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल 90 नथींवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

90 नथींवर महिला चोरट्यांचा डल्ला

बाजारपेठ पारनाका या ठिकाणी असलेल्या मानसी ज्वेलर्स दुकानात 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला नाकातील नथ व कानातील कर्णफुले घेण्याच्या बहाण्याने आल्या असता आपापसात संगनमत करून दुकानाच्या काऊंटरवरील लाल रंगाच्या फोल्डर मध्ये लावून ठेवलेल्या 2 लाख 71 हजार रुपये किमतीच्या 90 नथींवर दुकानदाराचे लक्ष विचलित करून महिलांनी डल्ला मारला.

सीसीटीव्ही तपासल्यावर चोरीची घटना समोर

सदरची बाब 9 नोव्हेंबर रोजी दुकानदार प्रदिप प्रकाश सोनी यांनी सीसीटीव्ही तपासले असता लक्षात आल्याने त्यानंतर त्यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेली हकीकत सांगितली.

सतत चोरीच्या घटना, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

पोलिसांनी दोन अज्ञात बुरखाधारी महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकूणच शहराच्या मुख्य बाजारपेठेत अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात पोलीस गस्त होत नसल्याने चोरट्यांचे फावत असून पोलिसांनी या ठिकाणी नियमित गस्त घालण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

हे ही वाचा :

बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळली; नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी ठार

Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!

पुण्यात मेडिकलचे शटर उचकटत पैश्यासह कॅडबरी व चॉकलेट चोरटयांनी लांबवले ; घटना सीसीटीव्हीत कैद

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.