चाकू आणि दारुच्या बाटलीने वार, मुंबईत भावोजींकडून मेव्हण्याची हत्या

संदीप राजपूत असं 24 वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. संदीपच्या हत्येप्रकरणी 28 वर्षीय आरोपी भरत मकवाना याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

चाकू आणि दारुच्या बाटलीने वार, मुंबईत भावोजींकडून मेव्हण्याची हत्या
भावोजींच्या हत्या प्रकरणात मेहुणा अटकेत
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 9:00 AM

मुंबई : मुंबईत भावोजींनी मेव्हण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चाकू आणि दारुच्या बाटलीने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. बोरिवली भागातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड (एमएचबी) पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी भावोजींना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

संदीप राजपूत असं 24 वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. संदीपच्या हत्येप्रकरणी 28 वर्षीय आरोपी भरत मकवाना याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी भरत आणि त्याची बायको म्हणजेच संदीपची बहीण या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. या भांडणात संदीपने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भरत आणि संदीपमध्येही वादंग झाला. या रागातून भरतने मेहु्ण्याची चाकू आणि दारुच्या बाटलीने वार करत हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला.

दोन तासात आरोपी जेरबंद

बोरिवली भागातील एमएचबी पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला जेरबंद केलं. मीरा रोड परिसरातून आरोपी भरत मकवाना याला अटक करण्यात आली. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड (एमएचबी) पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

उल्हासनगरात मेहुण्याकडून भावोजींची हत्या

दुसरीकडे, उल्हासनगरमध्ये मेव्हण्याने आपल्या भाऊजींची म्हणजेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये कॅम्प 3 भागातील सुभाष नगर परिसरात ही घटना घडली होती. भाऊजी बहिणीला मारहाण करताना झटापट झाली, अखेर भाऊजींनी उगारलेला चाकू मेहुण्याने त्यांनाच खुपसल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

मयत सचिन खेडेकर हा पत्नी शुभांगी खेडेकर सोबत उल्हासनगरमधील सुभाष नगर भागात वास्तव्याला होता. सचिन हा व्यसनाधीन असल्याचं बोललं जातं. तो सतत पत्नी शुभांगीला मारहाण करायचा. घटनेच्या रात्री सुद्धा त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी त्याचा मेव्हणा रोशन जाधव हा वाद सोडवण्यासाठी आला. सचिनने आपल्या पत्नीला मारण्यासाठी चाकू आणला होता, मात्र सचिनने तो चाकू मेहुणा रोशनवरच उगारला. रोशनने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि तोच चाकू सचिनला भोसकला. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

कुर्‍हाडीने वार करुन तरुणाची‌ हत्या, संशयित मेहुणा पसार

भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या

बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला

(Maharashtra Crime Mumbai Borivali Brother in law killed Sister’s Brother)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.