IIT Bombay तील विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलमध्ये आयुष्याची अखेर, सुसाईड नोटमध्ये कारण उघड
आयआयटी बॉम्बेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्याने सोमवारी सकाळी आत्महत्या केली. त्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली .
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अर्थात आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या (student suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी विद्यार्थ्याने स्वतःच्या आयुष्याची अखेर केली. हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विद्यार्थ्याच्या रुममध्ये सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळत आहे. नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे हॉस्टेल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
आयआयटी बॉम्बेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्याने सोमवारी सकाळी आत्महत्या केली. त्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली .या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी सांगितले की, एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला नैराश्याने ग्रासले होते आणि त्याच्यावर उपचार सुरु होते.
सुसाईड नोटमध्ये काय?
“त्याच्या जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये, त्याने सांगितले की त्याला नैराश्याने ग्रासले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही. पुढील तपास सुरु आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करत होता आणि दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.
Maharashtra | A 26-yr-old PG student of IIT Bombay died by suicide this morning, by jumping from the hostel’s 7th floor. In his recovered suicide note, he stated he had depression & was under treatment, he didn’t hold anyone responsible; further probe is underway: Mumbai Police
— ANI (@ANI) January 17, 2022
मानसिक तणावाचे कारण काय?
विद्यार्थ्याने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारल्याचे समोर आल्यानंतर त्याला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यार्थ्याच्या मानसिक तणावामागे नेमके काय कारण होते, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त, पुण्यातील जीवरक्षक तरुणाने आयुष्य संपवलं
नवी मुंबईत फळ व्यापाऱ्याची आत्महत्या, APMC मार्केटमध्येच आयुष्य संपवलं