महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, प्रायव्हेट पार्ट्सही दाखवले, लोअर परेल स्टेशनवर संतापजनक प्रकार

पीडित महिला दररोज लोअर परेल ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करते. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून संबंधित तरुण तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता.

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, प्रायव्हेट पार्ट्सही दाखवले, लोअर परेल स्टेशनवर संतापजनक प्रकार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 1:33 PM

मुंबई : महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत लैंगिक अवयव दाखवल्या प्रकरणी (flashing his private parts) तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील लोअर परळ (Lower Parel) रेल्वे स्थानकावर सोमवारी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी 32 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लोअर परळ रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या महिलेसोबत दोन दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला होता. रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात दिवसा ढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवत महिलेकडे अश्लील हावभाव केल्याचा आरोप आहे. शमशाद मुमताज अन्सारी असे आरोपीचे नाव असून तो कुर्ल्यातील इंदिरा नगर येथील रहिवासी आहे. महिला आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करत त्याला पोलिसांच्या हवाली केले.

काय आहे प्रकरण?

मुंबई सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला दररोज लोअर परेल ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करते. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून संबंधित तरुण तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. सोमवारी सकाळी 9 वाजून 33 मिनिटांच्या सुमारास पीडित महिला तिच्या भावासोबत लोअर परेल रेल्वे स्टेशनवर आली होती. त्यावेळीही आरोपीने असेच कृत्य केले.

पीडिता आणि भावाकडून आरोपीचा पाठलाग

त्यानंतर महिलेच्या भावाने आरोपी अन्सारीला जाब विचारला, तेव्हा त्याने तिच्या भावाला ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले. पीडित तरुणी आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करत त्याची धरपकड करण्यात यश मिळवले आणि त्याला स्टेशनवर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस ठाण्यात आणून आरोपी शमशाद मुमताज अन्सारीला अटक करण्यात आली. ‘मिड-डे’ वृत्तपत्राच्या वेबसाईटवर या संदर्भात बातमी देण्यात आली आहे.

प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या पोलिसांनी अन्सारीला मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस ठाण्यात आणले आणि महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली. मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक केदार पवार यांनी मिड-डेला सांगितले की, या प्रकरणातील आरोपीला आयपीसीच्या कलम 354(अ)(डी) आणि 509 अंतर्गत अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील महाडिक मायलेक आत्महत्या प्रकरण, पितापुत्राला अटक, सुसाईड नोटमुळे गूढ उकललं

दोन लग्नं मोडली, आता लिव्ह इन पार्टनरने घात केला, मुंबईत 29 वर्षीय महिलेची हत्या, 42 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.