Mumbai Murder | वादानंतर पोटच्या पोराचं डोकं हातोड्याने फोडलं, मुंबईत 52 वर्षीय आईला अटक

आरसीएफ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीनाका परिसरात शनिवारी रात्री उशिरा मायलेकामध्ये वाद घडला होता. लुर्थमेरी मुरगेशन (Lurthmary Murgeshan) असं आरोपी महिलेचं नाव आहे

Mumbai Murder | वादानंतर पोटच्या पोराचं डोकं हातोड्याने फोडलं, मुंबईत 52 वर्षीय आईला अटक
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 1:08 PM

मुंबई : पोटच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी मुंबईत 52 वर्षीय महिलेला अटक (Mother Kills Son) करण्यात आली आहे. दारु न आणल्यावरुन वाद घालत मुलाने आईला मारहाण केली होती. त्यानंतर तिने सख्ख्या मुलाला हातोड्याने मारुन त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. मुंबईतील चेंबुर भागात (Mumbai Chembur Murder) गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती.

काय आहे प्रकरण?

आरसीएफ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीनाका परिसरात शनिवारी रात्री उशिरा मायलेकामध्ये वाद घडला होता. लुर्थमेरी मुरगेशन (Lurthmary Murgeshan) असं आरोपी महिलेचं नाव आहे. तर प्रवीण मुरगेशन (Praveen Murgeshan) असं मयत मुलाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

“आधी प्रवीणने तिला मारहाण केली, त्यानंतर आईने त्याचं डोकं हातोड्याने फोडलं. त्यानंतर घराबाहेर पडून तिने दरवाजा लॉक केला. आपला मुलगा बेपत्ता असल्याचं तिने एका मैत्रिणीला सांगितलं. उद्या त्याचा शोध घेऊया, असं सांगून ती मानखुर्द भागातील एका नातेवाईकाच्या घरी गेली. तिथे आरोपी लुर्थमेरीचा नवरा बसला होता. तोच बनाव तिने नवऱ्यासमोर केला. मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नसल्याने त्याला संशय आला” अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी दुपारी प्रवीणचे आई-वडील घरी परत आले. त्यावेळी प्रवीणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांना या घटनेची तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत प्रवीणची आई लुर्थमेरी मुरगेशन हिला मंगळवारी बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या :

विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, 24 वर्षीय शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला बालदीत बुडवून मारलं

रिलेशनशीपनंतर लग्नाला नकार, प्रियकराने मॉलमध्ये भेटायला बोलवून प्रेयसीचा गळा आवळला

लग्नाला आला, जेवणावर ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.