बाबा, तुम्ही आई आणि धाकट्या बहिणीला का मारलंत? 89 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाने घडाघडा कारणं सांगितली

शेर-ए-पंजाब कॉलनीतील प्रेम संदेश सोसायटीत राहणाऱ्या गंधोक यांच्या फ्लॅटमध्ये सोमवारी सकाळी पोलीस शिरले, तेव्हा आरोपी पुरुषोत्तम सिंग गंधोक अत्यंत शांतपणे बसलेला दिसला, बेडरुममध्ये रक्ताने माखलेल्या बेडवर त्यांची मुलगी आणि पत्नी यांचे मृतदेह आढळले.

बाबा, तुम्ही आई आणि धाकट्या बहिणीला का मारलंत? 89 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाने घडाघडा कारणं सांगितली
अंधेरी दुहेरी हत्या आरोपी
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 8:44 AM

मुंबई : मुंबईतील 89 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाने (Ex Army Man) आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. रविवारी संध्याकाळी अंधेरी (पूर्व) भागातील अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत (Andheri Double Murder) हे हत्याकांड घडले. वृद्धाने अंथरुणाला खिळलेली 81 वर्षीय पत्नी आणि 55 वर्षीय गतिमंद मुलीचा गळा राहत्या घरात चिरला. हत्येच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीला फोन करुन त्याने या घटनेचीही माहिती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी आरोपीने मेघवाडी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (Mumbai Crime) केले. आरोपी पुरुषोत्तम सिंग गंधोक याने पोलिसांना सांगितले की, त्याने आपली पत्नी आणि मुलीची काळजी घेताना गेली 10 वर्षे अत्यंत क्लेश सहन केले आहेत, त्या दोघीही अंथरुणाला खिळल्या होत्या आणि त्यांना होणारा त्रास यापुढे त्याला बघायचा नव्हता.

शेर-ए-पंजाब कॉलनीतील प्रेम संदेश सोसायटीत राहणाऱ्या गंधोक यांच्या फ्लॅटमध्ये सोमवारी सकाळी पोलीस शिरले, तेव्हा आरोपी पुरुषोत्तम सिंग गंधोक अत्यंत शांतपणे बसलेला दिसला, बेडरुममध्ये रक्ताने माखलेल्या बेडवर त्यांची मुलगी आणि पत्नी यांचे मृतदेह आढळले.

काय आहे प्रकरण?

रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्याने पत्नी जसबीर कौर आणि मुलगी कमलजीत कौर यांची हत्या केली. त्यानंतर जवळपास 12 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर गंधोकने सोमवारी सकाळी 8.40 वाजताच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी गुरबिंदर कौर (58 वर्ष) हिला फोन करुन हत्यांची माहिती दिली.

किचनमधील चाकूने गळे चिरले

“गंधोक हा लष्करातील माजी सैनिक आहे. त्याने आपल्या पत्नी आणि मुलीचे गळे कापण्यासाठी स्वयंपाकघरातील चाकू वापरला. पत्नी आणि मुलीची काळजी घेण्यास, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास तो असमर्थ होता, तो त्यांच्या वेदना आणखी पाहू शकत नव्हता, म्हणून त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले” अशी माहिती डीसीपी (झोन एक्स) महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मोठी मुलगी-जावई घटनास्थळी

शेर-ए-पंजाब कॉलनीतच राहणारी त्याची मोठी मुलगी गुरबिंदर कौरने पोलिसांना सांगितले की, ती तिचे पती आणि मुलांसह आई-वडील आणि बहीण राहत असलेल्या फ्लॅटबाहेर पोहोचली, पण वडील आतून बंद असलेला दरवाजा उघडायला तयार नव्हते. मी आरडाओरडा केला, पण थोडा वेळ कोणीही प्रतिसाद दिला नाही. नंतर माझ्या वडिलांनी आम्हाला पोलिसांना बोलवायला सांगितले आणि फक्त त्यांच्यासाठीच दार उघडणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर गुरबिंदर कौर आणि त्यांचे पती मेघवाडी पोलिस ठाण्यात गेले आणि पोलिसांना घेऊन परतले. मेघवाडी पोलिसांनी सांगितले की, गंधोकने दरवाजा उघडला आणि बेडरुममध्ये प्रवेश केले असता, त्यांना गंधोकच्या मुलीचा मृतदेह लाकडी पलंगावर, तर पत्नीचा मृतदेह लोखंडी पलंगावर रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला.

हत्यांचं कारण काय?

आरोपी गंधोक खोलीत शांत बसला होता. गुरबिंदर कौरने तिच्या वडिलांना हत्या करण्याचे कारण विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, की तो बायको-मुलीच्या प्रदीर्घ आजारांना आणखी काळ झेलू शकत नव्हता, आणि त्यांना वेदना होताना पाहू शकत नव्हता. म्हणून रात्री 8.30 वाजता त्या झोपल्यानंतर त्याने दोघींची हत्या केली,” असे मेघवाडी पोलिसातील वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कुडूपकर यांनी सांगितले. गंधोक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पतीच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध, बोभाटा होताच नवऱ्याची हत्या, वर्ध्यात विवाहिता-प्रियकर आणि भाचा अटकेत

ब्रेकअपनंतरही तिला लग्न करायचं होतं, पण त्याच्या मनात…. मुंबईतील 28 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं

एकत्र बसून दारु प्यायचे, जेवणही करायचे, पण 100 रुपयांवरून वाजलं अन् हत्या केली, गादीत गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.