कारला धडक देत रिक्षातील चौघांचा राडा, मुंबईत बिझनेसमनला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अनिल मिश्रा यांच्या कारला एका रिक्षा चालकाने धडक दिली. त्यानंतर रिक्षात बसलेल्या चार जणांनी मिश्रा यांची कार थांबवली आणि त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

कारला धडक देत रिक्षातील चौघांचा राडा, मुंबईत बिझनेसमनला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न
समतानगर पोलीस ठाणे
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 2:20 PM

मुंबई : रोड रेज (Road Rage), अपहरण आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईतील समता नगर पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. कांदिवलीचा रहिवासी असलेला एका कुरिअर कंपनीचा ऑपरेटर अनिल मिश्रा घरी जात असताना शुक्रवारी त्याच्या कारला धडक देऊन चौघा जणांनी वाद घातला होता. त्यानंतर त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अनिल मिश्रा यांच्या कारला एका रिक्षा चालकाने धडक दिली. त्यानंतर रिक्षात बसलेल्या चार जणांनी मिश्रा यांची कार थांबवली आणि त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांनी मिश्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याला कुठेतरी पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

कोणाकोणाला अटक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा यांच्यासोबत घडलेली घटना पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केली. शैलेश कुमार तिवारी (वय 39 वर्ष), विजयराज शुक्ला (वय 54 वर्ष), रिक्षा चालक प्रदीप मिश्रा (वय 32वर्ष) आणि हा कट रचणारा आरोपी अजय मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींची पाळत

चार आरोपींनी पोलिसांना सांगितले, की मिश्रा व्यावसायिक असल्याची त्यांना माहिती होती. तो मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन प्रवास करत असल्यामुळे आरोपींनी त्याला लक्ष्य केले. हा गुन्हा घडवून आणण्यासाठी बराच काळापासून प्रयत्न करत होते.

समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हके यांनी सांगितले की, चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. घटनेचा तपास सुरू आहे.

वसईत स्कॉर्पिओची काच फोडत चालकाला मारहाण

दुसरीकडे, कारला कट बसल्याने तिघा जणांनी भर रस्त्यात स्कॉर्पिओ अडवून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भर पावसात ही घटना घडली होती. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ पीडित कार चालकाने ट्विटरवर शेअर केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या सतीवली खिंड येथे 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हर्षद पांचाळ असे मारहाण झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

Road Rage Video | कारला कट बसल्याचा राग, वसईत बॅटने स्कॉर्पिओची काच फोडत चालकाला मारहाण

VIDEO : फुकटात फरसाण न दिल्यानं पोलीस अधिकाऱ्याकडून विक्रेत्याला मारहाणीचा आरोप, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.