कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच

मालाड येथील एका इमारतीतील पोडियम पार्किंगमध्ये झालेल्या विचित्र दुर्घटनेत दुसऱ्या मजल्यावरुन चारचाकी गाडी खाली कोसळली. मात्र 22 वर्षीय तरुणी यातून चमत्कारिकरित्या बचावली

कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच
कार दुसऱ्या मजल्यावरुन कोसळून अपघात
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 2:57 PM

मुंबई : पोडियम पार्किंगच्या (podium parking space) दुसऱ्या मजल्यावरुन कार खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातातून 22 वर्षीय तरुणी आश्चर्यकारकरित्या बचावली. रविवारी सकाळी हा अपघात घडला होता. मुंबईतील मालाड भागात असलेल्या एका इमारतीच्या पोडियम पार्किंगमध्ये ही दुर्घटना (Mumbai Car Accident) घडली. अपेक्षा मिरानी ही तरुणी आपली कार दुसऱ्या मजल्यावर पार्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी अंदाज चुकल्याने तिच्या गाडीने वेग धरला आणि ती दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळली. यावेळी तिची गाडी पलटी झाली, तर ती कार खाली पडल्यामुळे खाली उभ्या असलेल्या वाहनाचाही अक्षरशः चुराडा झाला. मात्र 22 वर्षीय अपेक्षा या दुर्घटनेतून सुदैवाने बालंबाल बचावली. या धटनेमुळे पार्किंग करताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी सकाळी मालाड येथील एका इमारतीतील पोडियम पार्किंगमध्ये झालेल्या विचित्र दुर्घटनेत दुसऱ्या मजल्यावरुन चारचाकी गाडी खाली कोसळली. मात्र 22 वर्षीय तरुणी यातून चमत्कारिकरित्या बचावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेक्षा मिरानी असे या तरुणीचे नाव आहे. ती कार पार्क करण्याचा प्रयत्न करत असताना कारने वेग घेतला. त्यानंतर गाडी दुसऱ्या मजल्यावरुन तळ मजल्यावर पडली.

खाली उभ्या गाडीचा चुराडा

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील झकेरिया रोडवरील जैनसन्स बिल्डिंगमध्ये रविवारी सकाळी 7.35 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. अपेक्षा कार पार्क करत असताना ही घटना घडली. कार एका SUV वर पडल्याने तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला, पण अपेक्षा सुरक्षित राहिली. इमारतीचा सुरक्षारक्षक जिथे उभा होता, तिथेच ही गाडी पडली. सुदैवाने तोही या अपघातात सुखरुप आहे.

मालाड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अपेक्षा मिरानीच्या वडिलांनीच ही माहिती दिली. दुसऱ्या मजल्यावरुन गाडी उलटी पडली.

संबंधित बातम्या :

भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

मुंबईत रेंज रोवर कारचा अपघात, भरधाव गाडी दुभाजकावर धडकली, काचेवर भाजप खासदाराचे चिन्ह

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.