Bank Robbery | मुंबईतील SBI बँक शाखेत दरोडा आणि हत्या, दोघा आरोपींना काही तासात अटक

दहिसरमधील जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India Dahisar Branch) शाखेत बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास दोघे जण अचानक बंदुक घेऊन घुसले होते. आधी त्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या केली

Bank Robbery | मुंबईतील SBI बँक शाखेत दरोडा आणि हत्या, दोघा आरोपींना काही तासात अटक
गोळीबार करताना दरोडेखोर
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 9:59 AM

मुंबई : मुंबईत बँकेच्या शाखेत दरोडा टाकून खून केल्या प्रकरणी (SBI Branch Robbery and Murder) दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दहिसर पश्चिम भागातील एसबीआय बँकेच्या शाखेत भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

काय आहे प्रकरण?

दहिसरमधील जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India Dahisar Branch) शाखेत बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास दोघे जण अचानक बंदुक घेऊन घुसले होते. आधी त्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या केली, त्यानंतर अडीच लाख रुपये लुटून पळ काढला. ही घटना बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

आरोपींच्या बुटाचा डॉग स्क्वॉडकडून माग

घटनेनंतर मुंबई पोलिसांचे पथक बँकेत पोहोचले आणि बँकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांना आरोपीचे बूट सापडले होते. त्या बुटाचा माग काढत मुंबई पोलिसांचे श्वान पथक लपलेल्या आरोपींपर्यंत पोहोचले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलीस आरोपींपर्यंत कसे पोहोचले?

पोलिसांना आरोपीचे बूट सापडले होते, त्या बुटाचा वास आल्यानंतर मुंबई पोलिसांचा कुत्रा आरोपीच्या घरापर्यंत पोहोचला, त्यानंतर पोलिसांनी प्रथम दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने क्राइम ब्रँच आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला, तिथे एक आरोपी लपला होता. त्यानंतर काही वेळातच त्याच परिसरात आणखी एक आरोपी लपून बसल्याचे पोलिसांना आढळून आले. विकास यादव आणि धर्मेंद्र यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दुपारी 3.27 वाजता हे चोरटे बँकेत आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला. एक राऊंड फायरही केला. त्यानंतर बँकेतील अडीच लाख रुपये रक्कम लुटली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोघे जण कैद झाले, त्यापैकी एकाने सफेद रंगाचा, तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. दोघांनीही तोंडाला कपडा बांधल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं होतं.

या घटनेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी बँक कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आठ विशेष पथकं तयार केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना दहिसर परिसरातून अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार

Delhi Crime: दिल्लीत आणखी एका महिलेवर गँगरेप; दोघा नराधमांना अटक

SBI बँकेत गोळीबार, दहिसर शाखेतला एक कर्मचारी ठार, 2.50 लाख लुटून दोघे फरार

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.