Dockyard Road Station Attack | स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न, रेल्वे अधिकाऱ्यामुळे बचावले प्राण

| Updated on: Jan 04, 2022 | 9:21 AM

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हा हल्ला केल्याचा संशय आहे. जखमी महिलेवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dockyard Road Station Attack | स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न, रेल्वे अधिकाऱ्यामुळे बचावले प्राण
डॉकयार्ड रोड स्टेशनवरील हल्ल्याची सीसीटीव्ही दृश्य
Follow us on

मुंबई : रेल्वे स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आला आहे. सुदैवाने मध्य रेल्वेच्या सिनिअर तिकीट बुकिंग ऑफिसरला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने महिलेचे प्राण वाचवले. हार्बर रेल्वेवरील डॉकयार्ड रोड स्टेशनवर (Dockyard Road Station Lady Attack) हा प्रकार घडल्याची माहिती आहे. हल्ल्याचा हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हा हल्ला केल्याचा संशय आहे. जखमी महिलेवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसतं?

संबंधित महिलेने बुरखा घातला आहे, तर तिच्या मांडीवर लहान मुलगी बसल्याचं दिसतं. सुरुवातीला आरोपी तिच्या खांद्यावर हात टाकून शेजारीच बसला होता, त्यामुळे तो तिच्या ओळखीतील असल्याचं वाटतं. नंतर आरोपी समोर उभा राहिला, त्याने हळूच खिशातून चाकूसदृश्य धारदार शस्त्र बाहेर काढलं. महिलेचं लक्ष नसताना तिचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला.

हल्ला केल्यानंतर आरोपी मागच्या दिशेने पळून गेला. महिला आधी उठून उभी राहिली आणि त्याच्याकडे बघत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करु लागली. तर तिच्या मांडीवरची लहान मुलगीही खाली उभी राहिली. मात्र आरोपी पायऱ्यांवरुन धावत खाली जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो.

घटनेचे तपशील अस्पष्ट

सुदैवाने मध्य रेल्वेचे वरिष्ठ तिकीट बूकिंग ऑफिसर वेल मुरुगन गोपाळ कोनार यांना हा प्रकार वेळीच लक्षात आला आणि त्याने महिलेचे प्राण वाचवले. ही घटना नेमकी कधी घडली, याविषयी माहिती नाही. मात्र स्टेशनवर फारशी वर्दळ दिसत नसल्याने मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. ती महिला कोण आहे, आरोपी कोण आहे, दोघांचा एकमेकांशी काय संबंध, याविषयी अद्याप माहिती नाही. रेल्वे स्टेशनवरच तिचा हत्येचा प्रयत्न करण्याचे नेमके कारण काय, हेही अद्याप अस्पष्ट आहे.

संबंधित बातम्या :

ट्रेनमधून बाळ नदीत कोसळलं, लेकाला वाचवताना आईही पडली, भंडाऱ्यात हृदयद्रावक घटना

सलूनमध्ये नंबर लावण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, वाहनांची तोडफोड, नगरमध्ये पोलीस बंदोबस्त

पोलिसाकडून विवाहितेवर 6 वर्षांपासून बलात्कार, पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी