Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Revenge | बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या

पोलिसांनी आरोपीला अटक करुन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी बाळाची मोठी बहीण आणि आरोपी प्रियकर यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर तरुणीने आरोपीशी लग्न करण्यास नकार दिला होता.

Revenge | बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या
गोरेगावात बाळाची हत्या करणारा आरोपी गजाआडImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 2:09 PM

मुंबई : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराचा (Boyfriend) चांगलाच संताप झाला. प्रेयसीच्या 7 महिन्यांच्या भावाचे अपहरण करुन प्रियकराने चिमुकल्याची निर्घृण हत्या (Kidnap and Murder) केली. पाण्याच्या टाकीत बुडवून आरोपीने बाळाचा जीव घेतल्याचा आरोप आहे. मुंबईत (Mumbai Crime) गोरेगावजवळ आरे कॉलनी परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी रात्री 7 महिन्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, या घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. बाळाचे अपहरण करणारे दुसरे कोणी नाही, तर त्याच्या मोठ्या बहिणीचा प्रियकर असल्याचे समोर आले.

भांडणानंतर लग्नाला नकार

पोलिसांनी आरोपीला अटक करुन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी बाळाची मोठी बहीण आणि आरोपी प्रियकर यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर तरुणीने आरोपीशी लग्न करण्यास नकार दिला होता.

याचाच सूड घेण्यासाठी आरोपीने तिच्या सात महिन्यांच्या भावाचे अपहरण केले. त्याला जवळच्या कॉलेजमध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिले. यामध्ये बाळाचा बुडून मृत्यू झाला.

कन्नम मुथू स्वामी असे आरोपीचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी आरे कॉलनी परिसरात राहतो, तर मुलीचे कुटुंब फूटपाथवर राहते.

संबंधित बातम्या :

लाडीगोडी लावून शेतात नेलं, डोळ्यात मिरची पूड फेकून काटा काढला, वर्ध्यात शेतकऱ्याची निर्घृण हत्या

नोएडामध्ये मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक

उधारीने दिलेले पैसे देत नाही म्हणून हत्या, भंडारा शहरातील धक्कादायक घटना

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.