Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Theft | तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी, मुंबईत 28 वर्षीय कार ड्रायव्हरला अटक

बिझनेसमनकडे गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करताना आठ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या तरुणाला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी एफआयआर नोंदवून कांदिवली पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा आरोपी चोरी करुन सुरतला गेल्याचे आढळून आले.

Mumbai Theft | तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी, मुंबईत 28 वर्षीय कार ड्रायव्हरला अटक
कांदिवलीत तरुणाला अटकImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 9:38 AM

मुंबई : नवनवीन तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील कांदिवली पोलिसांनी एका बिझनेसमनच्या 28 वर्षीय कार ड्रायव्हरला (Car Driver) बेड्या ठोकल्या आहेत. बिझनेसमन आठ लाखांची रोख रक्कम घेऊन बाहेर निघाला होता. रोकड कारमध्येच ठेवून तो बाहेर पडल्याची संधी साधत चोरट्याने पैशांवर डल्ला (Mumbai Theft) मारला. आरोपी चोरी करुन आधी सुरत, नंतर अयोध्या, कोटा आणि अखेर चंदिगढला गेल्याचं पोलिसांना समजलं होतं. चोरीच्या पैशातून हॉटेल खरेदी करत रोज नवनवीन मुलींसोबत मजा-मस्ती करण्याचा त्याचा बेत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळल्या.

बिझनेसमनकडे गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करताना आठ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या तरुणाला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

18 जानेवारीला कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत राहणाऱ्या व्यावसायिकाने अमित राजेश सिंग नावाच्या ड्रायव्हरला कामावर ठेवले. 10 मार्च रोजी बिझनेसमन आपल्या गाडीतून 8 लाख रुपये कोणाला तरी देण्यासाठी जात होते.

नेमकं काय घडलं?

टिफिन घरीच विसरल्यामुळे तो आणण्यासाठी व्यावसायिक गाडीतून उतरला. इमारतीत वरच्या मजल्यावरील घरी गेला असता चालकाने डाव साधला. आधी त्याने कार सोसायटीच्या बाहेर नेली. नंतर मंदिराजवळ कार पार्क करुन त्यात ठेवलेले 8 लाख रुपये चोरले आणि ते घेऊन पळ काढला.

या प्रकरणी एफआयआर नोंदवून कांदिवली पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा आरोपी चोरी करुन सुरतला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर अयोध्येहून कोटा आणि त्यानंतर चंदिगढला गेल्याचंही समोर आलं.

चोरीच्या पैशातून हॉटेल खरेदी

तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने पोलीस चंदिगढला पोहोचले, तेव्हा चोरीच्या पैशातून तो तिथे हॉटेल खरेदी करण्याचा बेत आखत होता. रोज नवनवीन मुलींसोबत तो अय्याशी करत होता. एवढेच नाही तर चोरीच्या पैशांचा त्याने ऑनलाईन जुगार खेळण्यासाठीही वापर केल्याचं उघडकीस आलं.

सध्या कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक करून मुंबईत आणले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित राजेश सिंग असून त्याचे वय 28 वर्षे आहे. तो पोईसर, कांदिवली परिसरात राहतो. आरोपीने यापूर्वीही अनेक वेळा चोऱ्या केल्या असून त्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

चोरीच्या उद्देशाने सोलापूरहून सांगलीत, शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार ‘उडवणारा’ सापडला

सोलापुरात दरोड्यासह सहा घरफोड्या करणारा दरोडेखोर अटकेत; ग्रामीण गुन्हे शाखेकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.