महिला डॉक्टरचा मित्रासोबत अश्लील व्हिडीओ, कम्पाऊण्डरच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल, मुंबईत दोघांना अटक

अश्लील व्हिडीओच्या आधारे कम्पाऊण्डरच्या प्रियकराने आधी डॉक्टर महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. समशेरने डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांचे फोन नंबर मिळवले आणि त्यांना तिचा अश्लिल व्हिडीओ पाठवला

महिला डॉक्टरचा मित्रासोबत अश्लील व्हिडीओ, कम्पाऊण्डरच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल, मुंबईत दोघांना अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 9:28 AM

मुंबई : महिला डॉक्टर आणि तिच्या मित्राचा अश्लील व्हिडीओ शूट करत खंडणीची मागणी करणाऱ्या कम्पाऊण्डर महिलेला मुंबईत अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी कम्पाऊण्डरने डॉक्टरला दिली होती. आपल्या बॉयफ्रेण्डसोबत तिने हा कट रचल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने आरोपी प्रेमी युगुलाला अटक केली.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार डॉक्टर महिलेचे मुंबईतील शाहू नगर परिसरात क्लिनिक आहे. आरोपी ताहिरा खान क्लिनिकमध्ये कम्पाउण्डर म्हणून काम करत होती. तिने डॉक्टर आणि तिच्या मित्राचा अश्लील व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता. ही व्हिडीओ क्लीप तिने प्रियकर समशेर चौधरी याला दिली.

नेमकं काय घडलं?

अश्लील व्हिडीओच्या आधारे समशेरने आधी डॉक्टर महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. समशेरने डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांचे फोन नंबर मिळवले आणि त्यांना तिचा अश्लिल व्हिडीओ पाठवला. त्यानंतर पाच लाख रुपये दिले नाहीत, तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली.

प्रेमी युगुलाला अटक

डॉक्टरला बदनामीची भीती सतावत होती. त्यातच समशेरकडून खंडणीची मागणी जास्तच वाढू लागली. त्यामुळे डॉक्टरने धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण तो धारावी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. युनिट-5 चे प्रभारी घनशाम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल माळी, जयदीप जाधव तसेच इक्बाल सिंग, तानाजी पाटील, हरेश कांबळे या पथकाने तपास केला. समशेर चौधरीला पोलिसांनी घाटकोपरमध्ये पकडले. त्यानंतर त्याला साथ देणारी प्रेयसी ताहिरा खानला देखील अटक करण्यात आली.

महिला डॉक्टरच्या माध्यमातून धारावी पोलिसांनी समशेरला पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार पैसे घेण्यासाठी त्याला बोलावण्यात आले. पण पोलिसांचा प्लान समशेरला समजला आणि पैसे घेण्यासाठी तो आलाच नाही. समशेर धारावी पोलिसांच्या हाती लागला नाही, पण गुन्हे शाखेच्या जाळ्यात तो सापडलाच.

संबंधित बातम्या :

सेल्फी काढताना तोल गेला, इमारतीवरुन पडून भिवंडीत 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने संपूर्ण नांदेड हादरलं? वाचा सविस्तर

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.