मुंबईत विवाहितेवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन पतीला पाठवला, पतीने व्हायरल केला

ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला 5.20 लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

मुंबईत विवाहितेवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन पतीला पाठवला, पतीने व्हायरल केला
संग्रहित.
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 12:10 PM

मुंबई : विवाहितेवर बलात्काराचा व्हिडीओ शूट करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी महिलेच्या पतीलाही बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीचे अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घटस्फोटासाठी ब्लॅकमेल करत पतीनेच ते व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील देवनार भागात ही घटना घडल्याची धक्कादायक माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

देवनारमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला 5.20 लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

नवऱ्याकडूनही ब्लॅकमेल

महिलेने आरोपी ब्लॅकमेलरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीने ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. आपल्या पत्नीला आधार देण्याऐवजी पतीनेही तिलाच ब्लॅकमेल करुन घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर पतीने पत्नीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशातून पतीला बेड्या

आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

दरम्यान, बिहारमध्ये एका कुकने वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. आयपीएस अधिकारी आणि तिचा पती काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते, ही संधी साधून 50 वर्षीय स्वयंपाकीने 10 वर्षीय मुलीच्या बेडरुममध्ये प्रवेश केला आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. पीडित मुलीच्या जन्माआधीपासून स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या आरोपीवर कुटुंबाचा आंधळा विश्वास होता, मात्र त्याच्या विकृत मनोवृत्तीमुळे त्याला तडा गेला.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सचा बलात्कार

दुसरीकडे, मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीच्या एका मित्राने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने या पार्टीसाठी मुलीलादेखील बोलावलं होतं. ते सर्व मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले. त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला. ते त्या ठिकाणी गाडीतून पोहोचले होते. त्यांनी केक कारमध्ये ठेवून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी गाडीच्या आत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती जागा सोडल्यानंतर मुलगी मालाड भागातील एका मित्राच्या घरी गेली. पण तिथे त्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी तिथल्या घरातून कसंबसं बाहेर पडली. ती दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. तिथे त्याही मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.