Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Bidre Murder | ठाण्यात हॉटेलमध्ये एकत्र चहा, कारने मीरा रोडला, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कुरुंदकरचा पाय खोलात

एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पनवेल न्यायालयात ठाणे शहरापासून मिरा रोडपर्यंतच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

Ashwini Bidre Murder | ठाण्यात हॉटेलमध्ये एकत्र चहा, कारने मीरा रोडला, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कुरुंदकरचा पाय खोलात
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 12:34 PM

नवी मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांची हत्या (Ashwini Bidre Murder Case) होण्याच्या काही तास आधी हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) याला ठाणे शहरात भेटल्या होत्या. संध्याकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एकत्र चहा घेतला होता. त्यानंतर एकाच कारने दोघं जण मिरा रोडला कुरुंदकरच्या घरी गेले गेले, असं बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांकडे असलेल्या एमटीएनएलच्या मोबाईल लोकेशनवरुन स्पष्ट झालं आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 च्या रात्री झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती, हे सर्वांच्या एमटीएनएल मोबाईल सिम लोकेशनवरुन उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण?

एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पनवेल न्यायालयात ठाणे शहरापासून मिरा रोडपर्यंतच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पनवेल न्यायालयाच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्यासमोर एमटीएनएलचे निवृत्त नोडल अधिकारी धोत्रे यांनी आपली साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी धोत्रे यांची सरतपासणी घेतली. त्यांची उलटतपासणी पुढील तारखेला आरोपीचे वकील विशाल भानुशाली घेणार आहेत.

ठाण्यात चहा पिऊन कारने रवाना

या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी यांच्यासह अश्विनी बिद्रेही एमटीएनएल कंपनीचे सिम वापरत होत्या. त्यामुळे ही साक्ष महत्त्वाची होती. अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 रोजी रात्री झाली. त्यापूर्वी संध्याकाळी त्या आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे ठाणे शहरात भेटले. त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी चहा घेतला. त्यानंतर दोघेही कारने मिरा रोडच्या गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कुरुंदकरच्या घरी गेले.

कुंदन भंडारीचेही लोकेशन ट्रेस

दोघांचे मोबाईल जीपीआरएस ठाणे रेल्वे स्टेशनपासून कुरुंदकरच्या गोल्डन नेस्ट परिसरातील फ्लॅटपर्यंत एकत्र होते, हे नोडल अधिकारी धोत्रे यांच्या सरतपासणीत निश्चित झाले. याशिवाय कुंदन भंडारीचे लोकेशनही सापडले. अश्विनी बिद्रेंची हत्या झाली, त्याच दिवशी या हत्याकांडातील आरोपी कुंदन भंडारी हा मध्यरात्री मिरा रोड येथे आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती. हे एमटीएनएलच्या मोबाईल लोकेशनवरुन उघड झाले आहे. धोत्रे यांच्या साक्षीमुळे कुंदन भंडारीच्या गोल्डन नेस्ट आणि वसई खाडी पुलावरील लोकेशनची खात्री झाली आहे.

संबंधित बातम्या :

अश्विनी बिद्रेंच्या हत्येनंतर कुरुंदकरची परस्पर फ्लॅटला रंगरंगोटी, घरमालकाच्या दाव्याने ट्विस्ट

अश्विनी बिद्रे प्रकरणाची कोर्टात सुनावणी; डीजीपी नगराळेंना सहआरोपी करण्याची पतीची पुन्हा मागणी

आईप्रमाणे वडिलांचाही जीव घेतील, अश्विनी बिद्रेंच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.