Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमविवाहाला विरोध, मामाच्या 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण, नवी मुंबईत भाची-जावई जेरबंद

तरुणीचे आरोपी विपीन अग्रहरी याच्याशी सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर मामाने विरोध कायम ठेवला, म्हणून तिने नवऱ्याच्या मदतीने आपल्या मामे भावाचे अपहरण केले आणि मामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती,

प्रेमविवाहाला विरोध, मामाच्या 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण, नवी मुंबईत भाची-जावई जेरबंद
चिमुरड्याचे अपहरण, आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 11:36 AM

नवी मुंबई : प्रेमविवाहाला लग्नानंतरही विरोध कायम ठेल्याने मामाच्या 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील खांदेश्वर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या 4 तासांत अल्पवयीन मुलाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवले आणि आरोपींना अटक केली.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या विचुंभे गावातील रहिवासी विनय गामा सिंग यांनी मंगळवारी फिर्याद दिली होती. आपली पत्नी पिंकी सिंग हिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि एसएमएसद्वारे धमकी दिली की, तुमचा 6 वर्षांचा मुलगा यश (नाव बदलले आहे) आमच्या ताब्यात आहे. त्याला सोडवण्यासाठी 10 लाख रुपये दिले नाहीत, तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्याला ठार मारण्यात येईल. फिर्यादीविरुद्ध खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथके तैनात करण्यात आली. मोबाईल फोनद्वारे तांत्रिक तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची पथकं वांद्रे टर्मिनसकडे रवाना झाली.

नेमकं काय घडलं?

सखोल तपास करून पोलिसांनी आरोपी विपीन हिरालाल अग्रहरी (21 वर्ष) याला अटक केली. लहान मुलासह त्याच्यासोबत असलेल्या 19 वर्षीय तरुणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित तरुणीचे आरोपी विपीन अग्रहरी याच्याशी सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर मामाने विरोध कायम ठेवला, म्हणून तिने नवऱ्याच्या मदतीने आपल्या मामे भावाचे अपहरण केले आणि मामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती, असे अधिक तपासात समोर आले.

काही मिनिटांची दिरंगाई अन्…

पोलिसांना वेळ झाला असता, तर त्यांनी चिमुरड्याला उचलून उत्तर प्रदेशात पळ काढला असता. उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये दोघांनी हा कट रचला होता. संबंधित तरुणी आधी तिच्या मामाकडे राहण्यासाठी आली होती आणि त्यानंतर तिने नवऱ्याच्या मदतीने मामेभावाला पळवून नेण्याचा कट रचला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा कट उघड झाला आणि आत्तेबहिणीसह तिचा नवराही जेरबंद झाले.

संबंधित बातम्या :

दारु पिताना कानाखाली लगावली, मित्राचा मृत्यू, मुंबईत 27 वर्षीय तरुणाला अटक

VIDEO | गृहपाठ न करता खेळायला गेला, बापाने आठ वर्षांच्या मुलाला हातपाय बांधून छताला उलटं टांगलं

नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास

राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.