सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पनवेलची महिला कॉन्स्टेबल गजाआड, वरिष्ठाच्या हत्येचा शिजणारा कटही उघड

शिवाजी सानपच्या मृत्यूला जबाबदार ड्रायव्हरचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, शीतल पानसरेने ही योजना आखल्याचं समोर आलं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तिला अटक करण्यात आली होती.

सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पनवेलची महिला कॉन्स्टेबल गजाआड, वरिष्ठाच्या हत्येचा शिजणारा कटही उघड
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 1:52 PM

मुंबई : एक्स-बॉयफ्रेण्ड असलेल्या सहकाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पनवेलच्या महिला कॉन्स्टेबलच्या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांचे तपास पथकही चक्रावून गेले आहे. 29 वर्षीय आरोपी शीतल पानसरे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीही हत्या करण्याची योजना आखत होती. विशेष म्हणजे एका पोलीस उपनिरीक्षकाच्या साथीने तिने हा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित आरोपी पोलीस उपनिरीक्षक मात्र सध्या फरार आहे.

नवी मुंबईतील नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेली 29 वर्षीय महिला कॉन्स्टेबल शीतल पानसरे या प्रकरणात मुख्य संशयित आहे. याच नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्येच कॉन्स्टेबल पदावर असलेल्या शिवाजी सानपचा ऑगस्ट महिन्यात हिट अँड रनमध्ये मृत्यू झाला. घरी जात असताना शिवाजी सानपला नॅनो कारने धडक दिली होती. ‘मिड डे’ वेबसाईटने यासंबंधी वृत्त दिले आहे.

आरोपी महिला कॉन्स्टेबलचा एक्स बॉयफ्रेण्ड

शिवाजी सानपच्या मृत्यूला जबाबदार ड्रायव्हरचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, शीतल पानसरेने ही योजना आखल्याचं समोर आलं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तिला अटक करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे आरोपी शीतल पानसरे आणि मयत शिवाजी सानप हे यापूर्वी रिलेशनशीपमध्ये होते.

शीतल पानसरेला मदत केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आणखी दोघा जणांना अटक केली. त्याच पोलीस स्टेशनमधील पीएसआयही या कटात सामील असल्याचं तपासात उघडकीस आलं, मात्र तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी परागंदा झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हत्येचाही प्लॅन

दरम्यान, शीतल पानसरेच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला. त्यांनी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हत्येचाही प्लॅन आखला होता. “आम्ही तिच्याशी बोलून हत्येच्या कटाचं कारण जाणून घेतलं” अशी माहिती नवी मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. मात्र सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याचं नाव गुप्त राखलं आहे.

पानसरे आणि फरार पोलीस निरीक्षक यांची शिस्त आणि प्रशासकीय बाबींवरुन संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाशी झटापट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. यामुळे वरिष्ठांना दोघांविरुद्ध अहवाल देण्यास सांगण्यात आलं होतं. “आरोपींना शिवाजी सानपप्रमाणेच संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचाही रस्ता अपघातात मृत्यू घडवून आणायचा होता,” असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

नव्वदीच्या वृद्धासह पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत, उच्चभ्रू वस्तीमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ

हत्तीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती दान करणाऱ्या तरुणाची आठ गोळ्या झाडून हत्या

निर्घृण खुनाने नाशिक हादरले; चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.