नवी मुंबईतील लॉजवर प्रियकर-प्रेयसी भेटले, आधी जोरदार भांडणं, मग निर्घृण हत्याकांड

नवी मुंबईतील तुर्भे येथील साई प्रणव लॉजवर एक प्रेमी युगुल 23 तारखेला आलं होतं. रात्री त्यांच्यामध्ये मोठमोठ्याने भांडणं सुरु होती. त्यानंतर एपीएमसी पोलीस घटनास्थळी आले असता त्या लॉजमधील रुममध्ये महिला बेशुद्धावस्थेत आढळली

नवी मुंबईतील लॉजवर प्रियकर-प्रेयसी भेटले, आधी जोरदार भांडणं, मग निर्घृण हत्याकांड
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 2:32 PM

नवी मुंबई : लॉजवर बोलावून प्रियकराने प्रेयसीची हत्या (Girlfriend Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील साई प्रणव लॉजमध्ये (Navi Mumbai Lodge) ही घटना घडली. तरुणीचा गळा आवळून तरुणाने तिचा जीव घेतला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमी युगुलाने लॉजमध्ये एक रुम बूक केली होती. रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार भांडणं सुरु असल्याचे आवाज बाहेर येत होते. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा महिला बेशुद्धावस्थेत होती, मात्र रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तर तिच्यासोबत आलेल्या प्रियकराला (Boyfriend) पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.ॉ

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील तुर्भे येथील साई प्रणव लॉजवर एक प्रेमी युगुल 23 तारखेला आलं होतं. रात्री त्यांच्यामध्ये मोठमोठ्याने भांडणं सुरु होती. त्यानंतर एपीएमसी पोलीस घटनास्थळी आले असता त्या लॉजमधील रुममध्ये महिला बेशुद्धावस्थेत आढळली. महिलेला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे समजले.

प्रियकराकडून हत्येची कबुली

तिच्यासोबत आलेल्या तरुणाला पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता आपणच तिचा गळा आवळून खून केल्याचे त्याने कबूल केले.

पाच वर्षांपासून प्रेमसंबंध

खडकपाडा कल्याण येथे वास्तव्यास असणारा हा युवक मयत महिलेसोबत मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंधात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

चार वर्षांपासून रिलेशनमध्ये, प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिला, प्रियकराने थेट…

आईने बापाचा खून केला, पाच मुलं पोरकी, पोलिसातलं ‘मातृत्व’ जागं झालं, पाचही लेकरं दत्तक

खेड घाटातील 28 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकललं, मित्रांनी आधी दारु पाजली मग…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.