MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता, ‘त्या’ सेल्फीतला तरुण म्हणतो…

सदिच्छाने आपल्या बॉयफ्रेण्ड असल्याचं सांगितल्याचा दावा लाईफगार्ड म्हणून काम करणाऱ्या मितू सिंह याने केला आहे, मात्र कुटुंबीयांनी तो खोडून काढला. मुंबईतील कॉलेजला परीक्षेसाठी गेलेल्या सदिच्छाशी 15 दिवसांपासून संपर्क होऊ न शकल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे.

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता, 'त्या' सेल्फीतला तरुण म्हणतो...
सदिच्छा साने
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 9:22 AM

मुंबई : मुंबईजवळच्या बोईसरमधील खोदाराम भागात राहणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी (Palghar Boisar MBBS Student Missing) बेपत्ता होऊन दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप तिच्याशी संपर्क झालेला नाही. तर ज्या तरुणासोबत 22 वर्षीय सदिच्छा मनिष साने (Sadiccha Sane) हिचा सेल्फी सापडला आहे, त्या मितू सिंहने आपल्या फूड स्टॉलच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याचे पोलिसांना सांगितले. 29 नोव्हेंबरला मेडिकल प्रीलिम्ससाठी मुंबईतील कॉलेजला गेलेल्या सदिच्छाशी 15 दिवसांपासून संपर्क होऊ न शकल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे.

सदिच्छाचा शोध घेण्यासाठी आता सोशल मीडियासह बँड स्टॅन्डच्या बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले आहेत. सदिच्छाने आपल्या बॉयफ्रेण्ड असल्याचं सांगितल्याचा दावा लाईफगार्ड म्हणून काम करणाऱ्या मितू सिंह याने केला आहे, मात्र कुटुंबीयांनी तो खोडून काढला.

काय आहे प्रकरण?

22 वर्षीय सदिच्छा साने परीक्षेनिमित्त 29 नोव्हेंबरला बोईसरमधील घरुन निघाली. मात्र ती परीक्षा हॉलवरही पोहोचली नाही. तर त्या दुपारपासून तिचा फोन बंद येत आहे. तिचे शेवटचे लॉकेशन बँड स्टॅन्ड आले. तिला जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या मितू सिंहने पाहिले होते.

कोण आहे मितू सिंह? 

मितू सिंह याचा वांद्रे परिसरातील बँड स्टॅन्ड भागात मित्स किचन नावाचा फूड स्टॉल आहे. फूड स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांसोबत सेल्फी घेऊन आपण ते सोशल मीडियावर पोस्ट करतो. म्हणजे आपल्या फूड स्टॉलची प्रसिद्धी होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. अशा प्रकारे अनेक जणांसोबत काढलेले सेल्फीही मितने पोलीस आणि सदिच्छा सानेच्या कुटुंबियांनाही दाखवले.

वांद्रे पोलिसांनी मितचे दोन्ही मोबाईल ताब्यात घेत बोईसर पोलिसांकडे पाठवल्याची माहिती आहे. भायखळ्यामधील हॉस्टेलची सदिच्छा राहत असलेली खोली पोलिसांनी सील केली आहे. तसंच तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, सदिच्छाला कुठलाही बॉयफ्रेंड नाही, मितू सिंह कदाचित तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असावा, म्हणून तिने त्याला टाळण्यासाठी आपल्याला बॉयफ्रेण्ड असल्याचं खोटं सांगितलं असावं, असं तिच्या लहान भावाने सांगितलं.

संबंधित बातम्या :

Chain Snatching | पादचारी महिलांच्या सोनसाखळ्यांची चोरी, मुंबईत 32 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.