CCTV VIDEO | पन्नाशीची पुणेकर महिला, चोऱ्यांसाठी मुंबईत, पोलिसांच्या जाळ्यात कशी सापडली?

50 वर्षांच्या आरोपी महिलेचे नाव चिकूबाई काळे असून ती मूळ पुण्याची रहिवासी आहे. मुंबईतील कांदिवलीच्या चांदनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये महिला चोरी करतानाचे लाईव्ह सीसीटीव्ही फूटेज कैद झाले आहे.

CCTV VIDEO | पन्नाशीची पुणेकर महिला, चोऱ्यांसाठी मुंबईत, पोलिसांच्या जाळ्यात कशी सापडली?
पुण्यातील महिलेची मुंबईत चोरी
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 8:17 AM

मुंबई : मुंबईतील कांदिवली पोलिसांनी हायप्रोफाईल परिसरातील इमारतीच्या उघड्या घरात घुसून चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. 50 वर्षीय महिला कपाटाच्या लॉकरमधून सोने आणि पैसे चोरुन पळून जात असल्याचा आरोप आहे. ही महिला मूळ पुण्याची रहिवासी आहे. विशेषतः चोरीच्या उद्देशाने ती मुंबईत यायची आणि चोरी झाल्यानंतर पुन्हा पुण्यात पळून जात असे.

सध्या या महिलेला कांदिवली पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. आरोपी महिलेचे नाव चिकूबाई काळे असून ती 50 वर्षांची आहे. कांदिवलीच्या चांदनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये महिला चोरी करतानाचे लाईव्ह सीसीटीव्ही फूटेज कैद झाले आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसते?

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये साडी नेसलेली एक महिला वेगाने इमारतीत येते आणि त्याच वेगाने बाहेर पडताना दिसते. दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये ती महिला चोरी करताना दिसत आहे.

तीन ठिकाणी एफआयआर

पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार यांनी सांगितले की, महिलेविरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, सध्या आरोपी महिला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

पाहा व्हिडीओ :

अंबरनाथमध्ये पँट चोरी, खिशात सापडलं एटीएम कार्ड

दुसरीकडे, घरात लटकवलेली पँट भंगारवाल्या महिलांनी चोरून नेल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात नुकतीच उघडकीस आली होती. या पँटमध्ये असलेला मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रं हेदेखील महिलांनी लंपास केलं. याशिवाय एटीएम कार्ड वापरुन बँक खात्यातील सर्वच्या सर्व म्हणजे साडेआठ हजार रुपयांची रोकडही काढून घेतली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

अंबरनाथ पूर्वेच्या आंबेडकर नगर भागात दोन भंगारवाल्या महिला फिरत होत्या. त्यावेळी त्यांचं लक्ष बाळासाहेब लिंबाळे यांच्या घराकडे गेलं. या घराचा दरवाजा उघडा असल्यानं महिला घरात शिरल्या. त्यांनी घरात जाऊन दरवाजाला लटवकलेली पॅण्ट चोरली आणि पोबारा केला. या पँटमध्ये लिंबाळे यांचा मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रं होती.

धक्कादायक बाब म्हणजे एटीएम कार्डाचा पासवर्ड सुद्धा कार्डासोबत लिहून ठेवलेला असल्यानं या महिलांनी एटीएम कार्ड वापरून लिंबाळे यांच्या अकाऊंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे म्हणजे साडेआठ हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे लिंबाळे यांचं मोठं नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या :

घरात लटकवलेली पँट चोरली, खिशातल्या एटीएम कार्डवरच आयता पिन नंबर सापडला, मग काय…

Ahmednagar | शिर्डीत धूम स्टाईल चोरी, शिक्षिकेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण लांबवले

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.