भिवंडी : सेल्फी काढण्याच्या नादात बाळगलेली निष्काळजी जीवावर बेतल्याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहे. सेल्फी काढताना इमारतीवरुन पडल्यामुळे 13 वर्षीय मुलाला जीव गमावावा लागला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.
काय आहे प्रकरण?
भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथील हीना मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरुन खाली पडल्याने एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
इमारत अर्धवट तोडलेली
हीना मार्केट ही तळ अधिक दोन मजली इमारत महानगरपालिकेने अनधिकृत ठरवली आहे. कारवाई करताना इमारत अर्धवट तोडून ठेवली असल्याने पडीक झालेल्या या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर परिसरातील मुले खेळण्यासाठी जात असतात. इथे यापूर्वी सुद्धा काही अपघात झाल्याचे बोलले जाते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा सेल्फी काढण्याच्या नादात इमारतीच्या छताच्या किनाऱ्यावर उभा होता. फोटो काढताना भान न राहिल्यामुळे तोल जाऊन तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या :
पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने संपूर्ण नांदेड हादरलं? वाचा सविस्तर
पतीच्या मृत्यूनंतर जोडीदार शोधणे 55 वर्षीय महिलेला पडले महागात ; सव्वा चार लाखांची फसवणूक