पकडले जाण्याच्या भीतीने पाईपवरुन उतरणं अंगलट, डोंबिवलीत बिल्डिंगमधून पडून चोराचा मृत्यू

सुरक्षारक्षकाने त्यांचा पाठलाग करत त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने या दोघांनी इमारतीच्या डक्टमधील पाईपला पकडून खाली उतरायला सुरुवात केली. या प्रयत्नात मोहम्मद आणि अरफान हे दोघेही खाली कोसळले.

पकडले जाण्याच्या भीतीने पाईपवरुन उतरणं अंगलट, डोंबिवलीत बिल्डिंगमधून पडून चोराचा मृत्यू
चोरी करताना इमारतीतून पडून मृत्यूImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 7:27 AM

डोंबिवली : पकडले जाण्याच्या भीतीने पाईपला पकडून बिल्डिंगमधून खाली उतरायचा प्रयत्न करणं चोराच्या जीवावर बेतलं. इमारतीवरुन खाली पडून चोरट्याचा मृत्यू (Thief Death) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Thane Dombivali Crime News) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षारक्षकाने पाठलाग केल्यानंतर घाबरलेले दोघे चोर डक्टमधील पाईपला धरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र या नादात खाली पडून चोर (Theft) गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मृत तरुणासह त्याच्या साथीदारावर चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मयत तरुण हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात केडीएमसीने बीएसयूपी योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी इमारती उभारल्या आहेत. या इमारतींमधील सदनिकांचा अद्याप लाभार्थ्यांना ताबा देण्यात आलेला नसल्यामुळे या इमारती रिकाम्या पडून आहेत. याचाच फायदा घेत गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी या इमारतींकडे मोर्चा वळवला आहे.

हे सुद्धा वाचा

भुरट्या चोरांचा सुळसुळाट

या इमारतींमधल्या घरात जाऊन तिथले दरवाजे, ग्रील, नळ, वायरिंग चोरटे चोरून नेतात. त्यामुळे या इमारतींबाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. मात्र या सुरक्षारक्षकाची नजर चुकवून सोमवारी रात्री मोहम्मद सलीम भाटकर आणि अरफान पिंजारी हे दोन चोरटे चोरी करण्यासाठी इमारतीत घुसले.

डक्टमधील पाईपवरुन खाली उतरायला सुरुवात

ही बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच सुरक्षारक्षकाने त्यांचा पाठलाग करत त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने या दोघांनी इमारतीच्या डक्टमधील पाईपला पकडून खाली उतरायला सुरुवात केली. या प्रयत्नात मोहम्मद आणि अरफान हे दोघेही खाली कोसळले.

दोघांवर चोरीच्या प्रयत्नांचा गुन्हा

यापैकी मोहम्मद भाटकर या चोरट्याचा मृत्यू झाला. तर अरफान पिंजारी हा चोरटा जखमी झाला. या घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी या दोघांच्या विरोधात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील मृत मोहम्मद सलीम भाटकर हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.