Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये विवाहितेवरील बलात्काराला कोणी विरोध का केला नाही? प्रवाशाने सांगितली भयावह कहाणी

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

भरलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये विवाहितेवरील बलात्काराला कोणी विरोध का केला नाही? प्रवाशाने सांगितली भयावह कहाणी
पुष्पक एक्सप्रेस दरोडा आणि बलात्कार प्रकरण, आठही आरोपींना बेड्या
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 1:36 PM

ठाणे : लखनौहून मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार केल्याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दरोडेखोरांनी लुटमारीसोबतच एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बलात्कार आणि दरोड्याची घटना घडत असताना बोगीतील एकही प्रवासी विरोधासाठी पुढे का आला नाही, असा सवाल विचारला जात आहे. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या 25 वर्षीय तरुणाने त्या रात्री नेमकं काय काय घडलं, हे सांगितलं.

प्रवाशाने काय सांगितलं?

‘असं वाटत होतं, की त्यांनी मद्यप्राशन केलं होतं किंवा कुठल्या प्रकारची ड्रग्ज घेतली होती. ट्रेनमध्ये चढताच ते आक्रमकपणे वागत होते. त्यांनी सर्वात आधी बोगीमध्ये असलेल्या प्रवाशांसोबत धक्काबुक्की करायला सुरुवात केली. स्टेशनमधून रेल्वे बाहेर पडताच ते अधिकच हिंसक झाले. आरोपींकडे हातात घालायचे नकल डस्टर (knuckle duster) होते, ज्याने ते प्रवाशांच्या डोक्यावर वार करुन त्यांच्याकडून पैसे हिसकावत होते, असं संबंधित तरुणाने सांगितलं.

डोक्यावरही धारदार शस्त्राने हल्ला

‘त्यांच्याकडे नकल डस्टरसह चाकूही होता, ज्याद्वारे ते प्रवाशांना धमकावत होते आणि पैसे मागत होते. त्यांनी काही प्रवाशांवर हल्लाही केला. मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझ्या डोक्यावरही धारदार शस्त्राने हल्ला केला. माझे रक्त वाहू लागले. मी घाबरलो आणि शांत झालो’ व्यवसायाने कूक असलेला संबंधित प्रवासी लॉकडाऊन संपल्यानंतर पहिल्यांदाच लखनौहून मुंबईला परत येत होता.

विवाहितेवर वाईट नजर

ट्रेन कसारा घाटात पोहोचताच त्या आठ गुंडांनी एका महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. कसारा घाटात गाड्यांसाठी अनेक एक्झिट बोगदे आहेत. ‘गुंडांनी अनेक प्रवाशांची लूट केली. या वेळेत सर्वाधिक हिंसक झाले होते. त्याच वेळी, त्यांची नजर एका महिलेवर पडली, जी तिच्या पतीसोबत बसली होती. त्यांनी महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. महिलेचा पती त्यांच्याशी भिडला. त्यांच्या वर्तनावर मीही आक्षेप घेतला. पण त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांनी एका प्रवाशाला ट्रेनमधून बाहेर फेकण्याचाही प्रयत्न केला, पण ट्रेनचा वेग कमी झाल्याने तो वाचला, असं तरुणाने सांगितलं.

स्टेशन जवळ येताच आरडाओरड

त्या बदमाशांनी त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केले. आम्हा सर्वांना खूप असहाय्य वाटले. ट्रेनमध्ये बसलेला एकही प्रवासी त्या भीषण घटनेला थांबवण्याची हिंमत अंगी आणू शकला नाही. सगळे खूप घाबरले होते. ट्रेन कसारा स्थानकाजवळ पोहोचल्यावर महिलेवरी अत्याचाराचे सत्र थांबले. यावेळी काही प्रवाशांनी स्टेशन जवळ आल्याचे पाहिले. काही जणांनी धीर एकवटून मदतीसाठी आरडाओरड केली, असेही त्याने सांगितले.

एकाला टॉयलेटमध्ये बंद केलं

स्टेशन आल्यावर आम्ही सगळे ओरडू लागलो. पण 6 जण ट्रेनमधून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. एक जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, मी हिंमत करुन त्याला पकडले. मग इतर काही जणही माझ्या मदतीला आले. आम्ही त्याला शौचालयात बंद केले. लोकांचा आरडाओरडा ऐकून पोलीस बोगीत चढले आणि त्यांनी आणखी एका बदमाशला पकडले. नंतर आम्ही पकडलेल्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

‘या घटनेने मला खूप धक्का बसला आणि मला भीती वाटत आहे. मला खूप वाईट वाटत आहे की इतकी माणसे असूनही, आम्ही त्या महिलेसोबतच्या झालेले क्रूर अत्याचार थांबवू शकलो नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

पुष्पक एक्सप्रेस दरोडा आणि बलात्कार प्रकरण, आठही आरोपींना बेड्या, पोलिसांनी नराधमांना कसं पकडलं?

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.