Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे वाळत घालण्याचा वाद, शेजाऱ्यांशी भांडायला बायको आली नाही, नवऱ्याने माहेरी जाऊन भोसकलं

जगदिशच्या घरासमोर त्यांच्या शेजाऱ्यांनी कपडे वाळत घातल्यामुळे दोघांचा मोठा वाद झाला. यावेळी जगदिशने माहेरी गेलेली पत्नी सुप्रियाला फोन केला आणि भांडण्यासाठी बोलावलं. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे तिने घरी येण्यास नकार दिला.

कपडे वाळत घालण्याचा वाद, शेजाऱ्यांशी भांडायला बायको आली नाही, नवऱ्याने माहेरी जाऊन भोसकलं
विरारमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 1:24 PM

विरार : घराजवळ कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्व भागात राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेची पतीनेच हत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. त्यानंतर चौकशीदरम्यान हत्येचं चक्रावून टाकणारं कारण समोर आलं आहे. पतीने रविवारी रात्री माहेरी येऊन केलेल्या हल्ल्यात पत्नीला प्राण गमवावे लागले, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. आरोपी पतीचा शोध सुरु आहे.

विरारमधील कॉम्प्लेक्समध्ये थरार

मयत सुप्रिया जगदिश गुरव (वय 28 वर्ष) आणि तिचा पती जगदिश हे वसई रेल्वे स्थानकाबाहेर तिकीट विक्री करणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करत होते. सुप्रियाची 47 वर्षीय आई सुषमा शेट्टी यांच्या राहत्या घरी रविवारी रात्री 9 वाजता हा प्रकार घडला. सुषमा शेट्टी विरारमधील नरेंद्र ब्रह्म कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये राहतात. तर जावई जगदिश आणि मुलगी सुप्रिया जवळच भाड्यावर घर घेऊन राहतात.

शेजाऱ्यांसोबत वाद

जगदिशच्या घरासमोर त्यांच्या शेजाऱ्यांनी कपडे वाळत घातल्यामुळे दोघांचा मोठा वाद झाला. यावेळी जगदिशने माहेरी गेलेल्या सुप्रियाला फोन केला आणि भांडण्यासाठी बोलावलं. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे तिने घरी येण्यास नकार दिला. बायकोने दिलेल्या नकारामुळे जगदिशचा पारा चढला आणि तो तडक तिच्या माहेरी येऊन थडकला.

बायकोला भोसकलं, सासूवरही वार

तिथे येऊन त्याने बायको आणि सासूला शिवीगाळ केली. सासूने त्याला प्रत्युत्तर केलं असता जावई जगदिशने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. हे पाहून सुप्रियाने जगदिशला ढकललं. मात्र जगदिशने स्वयंपाकघरात जाऊन चाकू आणला आणि तिच्या छातीत खुपसला. सासूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्याही हातावर सुरीने वार केले आणि तो घटनास्थळावरुन पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सासू गंभीर जखमी

मायलेकीचा आरडाओरडा ऐकून त्यांचे शेजारी धावत आले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुप्रिया आणि सुषमा या दोघींना जवळच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी सुप्रियाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. तर सुषमाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

आरोपी पतीला दारुचे व्यसन

2020 मध्ये पतीच्या निधनानंतर सासू सुषमा शेट्टी घरकाम करतात. सुप्रिया, जगदिश आणि त्यांची तीन मुलं आधी त्यांच्यासोबतच राहत होती. मात्र नंतर ते भाड्याच्या खोलीत राहायला गेले. जावई जगदिश दारुच्या आहारी गेल्याची माहितीही सुषमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

माहेरी गेलेल्या पत्नीची हत्या, घरगुती वादातून विरारमध्ये पतीचं टोकाचं पाऊल

पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.