Car Accident | इंटरव्ह्यूहून परत येताना काळाचा घाला, कार दुभाजकाला धडकून आर्किटेक्टचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे गावच्या हद्दीतील वाघोबा खिंडीत पहाटे दीड वाजताच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगातील अल्टो कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी महामार्गाच्या दुभाजकाला धडकली.

Car Accident | इंटरव्ह्यूहून परत येताना काळाचा घाला, कार दुभाजकाला धडकून आर्किटेक्टचा मृत्यू
पालघरमध्ये भीषण कार अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 11:13 AM

मोहम्मद हुसेन खान, टीव्ही9 मराठी, पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात (Car Accident) झाला. या अपघातात तरुण वास्तुविशारदाचा मृत्यू (Architect) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर दोन सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ढेकाळे गावच्या हद्दीतील वाघोबा खिंडीत हा अपघात झाला. भरधाव वेगातील अल्टो कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची माहिती आहे. मंगळवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. नोकरीची मुलाखत देण्यासाठी आर्किटेक्ट तरुण मुंबईला गेला होता, तिथून परत येताना काळाने घाला घातला.

नेमकं काय घडलं?

मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे गावच्या हद्दीतील वाघोबा खिंडीत पहाटे दीड वाजताच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगातील अल्टो कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी महामार्गाच्या दुभाजकाला धडकली.

आर्किटेक्टचा मृत्यू, सहकारी जखमी

अपघातात कार चालक जिगर जैन याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. वास्तुविशारद असलेला जिगर नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी मुंबईला गेला होता. मुंबईवरून वापीच्या दिशेने परतीच्या मार्गावर असताना हा अपघात झाला.

जिगरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात भावेश देवराज मेस्त्री (वय 26 वर्ष) आणि उत्तम सैनी (वय 26 वर्ष) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वापी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या :

Jalgaon Accident | अरुंद रस्त्यावर कारची धडक, दोघा बाईकस्वार तरुणांचा मृत्यू

मैत्रिणींसोबतची होळी ठरली शेवटची; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या 26 वर्षी अपघातात मृत्यू

ट्रकवर इनोव्हा धडकून भीषण अपघात, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञाचं अख्खं कुटुंब मृत्युमुखी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.