Malad Crime: मालाडचं मालवणी ठरतंय मर्डर नगर! गेल्या 72 तासात 3 हत्या तर 15 दिवसात 4 खून, निव्वळ खळबळजनक

| Updated on: Jul 17, 2022 | 1:46 PM

Malad Crime News : शुल्लक कारणावरुन वाद हत्या हत्याकांडासारखे गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण मालवणीत जास्त असल्याचं दिसून आलंय.

Malad Crime: मालाडचं मालवणी ठरतंय मर्डर नगर! गेल्या 72 तासात 3 हत्या तर 15 दिवसात 4 खून, निव्वळ खळबळजनक
मालाडमध्ये हत्याकाडांचं सत्र
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईचा मालाडमधील (Malad Crime News) मालवणी भाग हा कुप्रसिद्ध होत असून या भागात गेल्या काही दिवसांत हत्याच्या घटनांनी (Malad Murder News) डोकं वर काढलंय. त्यामुळे मालवणी हे मर्डर नगर म्हणून ओळखलं गेलं, तर आश्चर्य वाटायला नको. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 72 तासात मालवणीमध्ये तीन हत्या झाल्या आहेत. तर मागच्या 15 दिवसात 4 जणांची हत्या करण्यात आली आहे. या वाढत्या हत्येच्या खटनांनी मालवणीसह (Malad West) संपूर्ण मालाडमध्ये खळबळ माजली आहे. शुल्लक कारणावरुन वाद हत्या हत्याकांडासारखे गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण मालवणीत जास्त असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे वाढते गुन्हे कसे रोखायचे, असं आव्हानंही मालवणी पोलिसांसमोर उभं ठाकलंय. तर दुसरीकडे पोलिसांचा धाक कितीपत उरलाय, असाही प्रश्न या हत्येच्या वाढत्या प्रकरणांनी उपस्थित केलाय. या धक्कादायक घटना नेमक्या कोणकोणत्या होत्या? त्या नेमक्या केव्हा घडल्या? आणि या हत्येबाबत पुढे काय झालं, हे जाणून घेऊयात.

  1. हत्या क्रमांक 01 : 14 जुलै :
    पहिला खून प्रेयसीचा करण्यात आला होता. प्रियकराने 14 जुलै रोजी मढ आइलैंडवरील एका लॉजमध्ये आपल्या प्रेयसीची हत्या केली होती. या घटनेनं खळबळ माजली होती. वाचा सविस्तर
  2. हत्या क्रमांक 02 : 15 जुलै :
    जवळ झोपू देत नाही पतीने पत्नीचा खून केला. माथेफिरु पतीने दगडाचा पाटाच पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटकदेखील केली. आरोपी पतीची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरु आहे. वाचा सविस्तर
  3. हत्या क्रमांक 03 : 16 जुलै :
    एका अल्पवयीन मुलाने तरुणाला चाकूने भोसकलं होतं. 16 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता मालवणीतील अंबोजवाडी परिसरात मृत तौफीक खान हा शौचास जात होता, त्याचवेळी 16 वर्षीय आरोपीसोबत दोघांमध्ये भांडण सुरू झाले. आणि आरोपींनी तौफीक खानवर चाकूने वार करून त्याची हत्या केली, या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही मालवणी पोलिसांनी अटक केली. वाचा सविस्तर
  4. हत्या क्रमांक 04 : 25 जुलै :
    29 जुलै रोजी 25 वर्षीय तरुणाने आपल्याच वहिनीची हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. मोबाईलवर काय खेळत बसतोत, तो गेम बंद कर आणि नोकरी शोध असं म्हटल्याने दिराने आपल्याच वहिनीचा खून केली होता. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनानवही तरुणाने रचला होता. इर्शाद आलम असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला. हत्येच्या चार दिवसांनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. वहिनी किचनमध्ये असताना आलमने तिच्या पाठीमागे घुसून कपड्याने तिचा गळा आवळून खून केला. साहिबा असं या 25 वर्षांच्या विवाहितेचं नाव होतं. वाचा सविस्तर
  5. हे सुद्धा वाचा

या चारही घटनांकडे पाहता, मालाडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी तत्काळ गंभीर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. वाढत्या हत्येच्या घटनांनी मालाडच्या मालवणीमधील लोकंही प्रचंड दहशतीखाली आहेत.