एकत्र बसून दारु प्यायचे, जेवणही करायचे, पण 100 रुपयांवरून वाजलं अन् हत्या केली, गादीत गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न

मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो, ऐकत असतो. पण कौर्य आणि विकृतीचा कळस गाठणारी घटना दहिसरमध्ये घडली आहे. दोन सख्ये मित्रं. एकत्र बसून दारु प्यायचे, एकत्र जेवण करायचे आणि एकत्रच फिरायचे.

एकत्र बसून दारु प्यायचे, जेवणही करायचे, पण 100 रुपयांवरून वाजलं अन् हत्या केली, गादीत गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 4:17 PM

मुंबई: मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो, ऐकत असतो. पण कौर्य आणि विकृतीचा कळस गाठणारी घटना दहिसरमध्ये घडली आहे. दोन सख्ये मित्रं. एकत्र बसून दारु प्यायचे, एकत्र जेवण करायचे आणि एकत्रच फिरायचे. पण या दोघांमध्ये 100 रुपयांवरून वाजलं. उधार दिलेले 100 रुपये मागितले म्हणून संतापलेल्या मित्राने मित्राचीच गळफास लावून हत्या (Murder) केली. एवढं करून हा नराधम थांबला नाही तर त्याने मृतदेह गादीत गुंडाळून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. अखेर दहीसर पोलिसांनी (Dahisar Police) या नराधमाला अटक (Arrest) केली. पण केवळ शंभर रुपयांसाठी मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याच्या या घटनेने दहिसर हादरून गेलं आहे. संपूर्ण दहिसरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

परमेश्वर बाबूराव कोकोटे असं आरोपचीं नाव आहे. तो 28 वर्षाचा आहे. तो टेम्पोचा मालक असून तो टेम्पो चालवतो. तर मृताचे नाव राजू पाटील असं आहे. राजू हा 40 वर्षाचा असून तो गॅरेजमध्ये काम करायचा. मुंबई पोलीस झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी या हत्येची माहिती दिली. 5 फेब्रुवारी रोजी रात्री 12 च्या सुमारास दहिसर येथील एका गॅरेजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचा फोन पोलीस कंट्रोलमधून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलीस नियंत्रणाला फोन करणारा मृताचा मित्रच त्याचा मारेकरी असल्याचे समोर आले.

पेटवून दिले अन् फोन केला

आरोपी आणि मृत व्यक्ती दोघेही एकमेकांना सुमारे 8 वर्षांपासून ओळखत होते. दोघेही खूप चांगले मित्र होते आणि अनेकदा एकत्र बसून दारू प्यायचे, जेवणही करायचे. पण या दोघांची मैत्री 100 रुपयांसाठी अचानक खुनापर्यंत पोहोचली. आरोपीने मित्राचा गळा दाबून खून केल्यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मृतदेह गादीत गुंडाळून तो जाळण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर दहा मिनिटांनंतर परमेश्वरने पोलिसांना फोन केला आणि शेजारी आत्महत्या करत असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर दहिसर पोलीस अग्निशमन दलासह घटनास्थळी पोहोचले. पाटील यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर पोलिसांना कळले की पाटील यांचा मृत्यू भाजल्यामुळे नव्हे तर गळतीमुळे झाला. या अहवालानंतर पोलिसांनी परमेश्वरला ताब्यात घेतले. त्याने नंतर खुनाची कबुली दिली.

पोलिसांसोबत राहून तपासात मदत

आरोपीने पाईपच्या सहाय्याने मृताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हत्येनंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली. एवढेच नाही तर मारेकरी मित्रही पोलिसांसोबत राहून या प्रकरणात पोलिसांना मदत करत होता. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या:

Panvel Crime : पनवेलमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या पती-पत्नीचा रेल्वे अपघातात मृत्यू, आपटे गावावर शोककळा

मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे डॉक्टर पत्नीनेही जीवन संपवलं? ग्रुपमधल्या इतरांनाही धक्का, नांदेडच्या आत्महत्यांचं गूढ उकलेना!

गॅस गिझर गळतीमुळे बाथरूमध्येच पडल्या बेशुद्ध; पायलट महिलेचा हकनाक मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.