‘गोल्ड मॅन’ नव्हे ‘गोल्ड पाय’, तब्बल 7 कोटी रुपयांचं सोन्याचं ‘प्लॅस्टर’

दुबईतून फ्रॅक्चर पायाला प्लॅस्टर करुन एक व्यक्ती भारतात दाखल झाला. मात्र त्याला विमानतळावरच रोखलं गेलं. या व्यक्तीला नेमकं का रोखलं गेलं याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

'गोल्ड मॅन' नव्हे 'गोल्ड पाय', तब्बल 7 कोटी रुपयांचं सोन्याचं 'प्लॅस्टर'
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 11:27 PM

मुंबई : भारतात कधी डोक्याच्या विगमधून, कधी चॉकलेटमधून, कधी बॅगच्या लोखंडी रॉडमधून, चप्पलामधून आणि कधी-कधी चक्क सर्जरीनं शरिरातूनही सोन्याची तस्करी होते. आपण कल्पनाही करु शकत नाही अशा बेमालूमपणे सोनं आणून देशात विकलं जातं. सोनं असो की दारु… जितक्या ट्रिक्स उघड होतात, तितक्याच नव्यानं जन्मही घेतात. सीट, डिक्की आणि सीएनजीच्या सिलेंडरमधून तुम्ही दारु तस्करीचे व्हिडीओ बघितले असतील. पण थेट दारु तस्करीसाठीच मॉडिफाय केलेली गाडीही समोर आलेली. गाडी पाहिल्यावर त्यातून तस्करीची कुणाला कल्पना येणार नाही. पण पोलिसांना एक टीप मिळाली आणि भांडाफोड झाला.

ज्या फ्रॅक्चर पायातून सोनं काढलं गेलं, ते माहितीनुसार 12 किलो होतं. ज्याची किंमत 7 कोटींच्या घरात आहे. भारतात सोन्याची डिमांडमुळे तस्करीचंही प्रमाण मोठं आहे. ‘दैनिक भास्कर’च्या एका रिपोर्टनुसार जर आकडेवारी पाहिली, तर तुमचे डोळे विस्फारतील.वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार संपूर्ण भारतात खरेदीच्या रुपातलं 24 हजार टन सोनं आहे. त्यापैकी 21 हजार टन सोनं भारतीय महिलांकडे आहे. हे प्रमाण 5 मोठ्या देशांकडे रिझर्व्ह असलेल्या सोन्याहून जास्त आहे.

अमेरिकेच्या फॉरेन रिझर्व्हमध्ये 8 हजार टन, जर्मनीकडे 3300 टन, इटलीकडे 2450 टन, फ्रान्सकडे 2400 टन आणि रशियाकडे 1900 टन सोनं आहे. या सर्वांची गोळाबेरीज 16 हजार 150 टन सोनं होते, पण फक्त भारतीय महिलांकडे 21 हजार टन सोनं आहे. हे प्रमाण जगभरातल्या सोन्याच्या 11 टक्के आहे. गुंतवणूक म्हणून भारतीय आधी जमीन आणि नंतर सोन्याला प्राधान्य देतात. भारतात एकूण कमाईंच्या सरासरी 11 टक्के गुंतवणूक ही सोन्यात होते आणि बॅक, शेअर, म्युचअल फंड यांच्यातली गुंतवणूक फक्त 5 टक्के आहे.

हे सुद्धा वाचा

जेव्हापासून सोन्याच्या खाणींचा शोध लागला, तेव्हापासून आजपर्यंत जवळपास दोन लाख टन सोन्याचं उत्खनन झालंय.विशेष म्हणजे यापैकी 1.26 लाख टन सोन्याचं उत्खनन 1950 सालानंतर झालंय. अंदाजानुसार दरवर्षी जगात 3 हजार टन सोन्याचं उत्खनन होतं. मात्र पृथ्वीच्या पोटात किती सोनं दडलंय, याचा नेमका अंदाज आजपर्यंत कुणालाच बांधता आलेला नाही.

आता फक्त मंदिरांचा हिशेब केला तर देशभरातल्या मंदिरांमध्ये अडीच हजार टन सोनं असल्याचा अंदाज आहे. केरळच्या पद्मनाथ स्वामी मंदिराकडे 1300 टन सोनं असण्याचा अंदाज आहे. जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर असणाऱ्या तिरुपतीत दरमहा 100 किलो सोनं दान होतं. काही काळापूर्वी मंदिराकडून 4.5 टन सोनं बँकेत डिपॉझिट केलंय.

भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश असला तरी उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे आणि एका रिपोर्टनुसार आजवर जगात जितकं सोनं उत्खन्न झालंय. त्यापैकी फक्त 48 टक्के सोनं दागिन्यांच्या रुपात आहे म्हणजे निम्म्याहून जास्त सोनं आजही बाजारात कोणत्या स्वरुपात आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.