किराणा दुकानातून ड्रग्सची विक्री, कोट्यवधींचा ड्रग्सचा साठा जप्त, असा उघड झाला प्रकार
md drug: कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला किराणा दुकानात ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उल्हासनगरातील ग्रामीण भागामधील नेवाळी नाक्यावरील किराणा दुकानावर छापा टाकला.
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचे ठिकाण म्हणजेच किरणा दुकान असते. गल्ली-बोळात ही दुकाने असतात. किरणा दुकानातून रोज आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टी मिळतात. परंतु किरणा दुकानात ड्रग्स मिळणार का? चक्क एका दुकानदाराने हा उद्योग सुरु केला. या प्रकरणात पोलिसांनी राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याला अटक केली आहे. तसेच तिवारी याला ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. किरणा दुकानातून 4 कोटी 50 लाख 70 हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.
4 कोटी 50 लाखांचा साठा
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उल्हासनगरातील ग्रामीण भागामधील नेवाळी नाक्यावर राजेशकुमार तिवारी यांचे किराणा दुकान आहे. त्याच्या दुकानात एमडी ड्रग्सचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुकानावर छापा टाकून त्याच्याकडून तब्बल 4 कोटी 50 लाख 70 हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी राजेशकुमार प्रेमचंद तिवारी या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
असा लागला शोध
कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला किराणा दुकानात ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उल्हासनगरातील ग्रामीण भागामधील नेवाळी नाक्यावरील किराणा दुकानावर छापा टाकला. दुकानाची झाडाझडती घेतली असता किराणा दुकानदार राजेशकुमार तिवारी घाबरला. त्याच्या दुकानात 3 किलो 6 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर मिळून आली. या ड्रग्सची किंमत बाजारात 4 कोटी 50 लाख 70 हजार आहे.
तिवारीला पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरु
तिवारीला हा ड्रग्सचा साठा शैलेश राकेश अहिरवार याने पुरवला होता. त्याच्याकडून मिळालेल्या अमली पदार्थाची तिवारी हा बेकायदेशीर रित्या विक्की करत होता. याप्रकरणी दुकानदार राजेशकुमार तिवारी याला अटक करण्यात आली आहे. शैलेश अहिरराव यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहे. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषणच्या कारवाईने नशेचा बाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.