मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढल्या; पत्नी प्रीती चोक्सी ईडीच्या रडारवर

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याची पत्नी प्रीती चोक्सीही (preeti choksi) ईडीच्या रडारवर आली आहे. बँक घोटाळा प्रकरणात ईडी प्रीतीला आरोपी करणार आहे.

मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढल्या; पत्नी प्रीती चोक्सी ईडीच्या रडारवर
preeti choksi
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 4:45 PM

मुंबई: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याची पत्नी प्रीती चोक्सीही ईडीच्या रडारवर आली आहे. बँक घोटाळा प्रकरणात ईडी प्रीतीला आरोपी करणार आहे. दुसऱ्या आरोपपत्रात तिला आरोपी करण्यात येणार आहे. मेहुलसाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मनालं जात आहे. (mehul choksi wife preeti choksi came under ed radar)

पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करून फरार झालेल्या मेहुलने कोट्यवधीची मालमत्ता पत्नी प्रीतीच्या नावे केली आहे. ही सर्व मालमत्ता परदेशात आहे. दुबईसह इतर ठिकाणी ही मालमत्ता आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून ही मालमत्ता विकत घेण्यात आली आहे. त्यामुळे ईडी प्रीतीवर कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

Hillingdon Holdings या कंपनीत प्रीतीचा मालक्की हक्क असल्याचं आढळून आलं आहे. 2013मध्ये प्रीतीने गीतांजली जेम्समध्ये काम करणाऱ्या डिओन लिलीची भेट घेतली होती. त्यानंतर सी. डी. शाह आणि असिस्टंट नेहा शिंदे यांना सोबत घेऊन प्रीतीने तीन ऑफशोर कंपन्या स्थापन केल्या होत्या. या शिवाय 2014 मध्ये Hillingdon Holdings या कंपनीच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम वर्ग करण्यात आली होती. ज्या कंपनीला ही रक्कम देण्यात आली, ती कंपनी गीतांजली ग्रुपशी संलग्न होती. काही कागदपत्रांची चौकशी केली असता ही रक्कम प्रीतीच्या नावावर पैसे ट्रान्स्फर केल्याचं आढळून आलं आहे. या कागदपत्रांवर प्रीतीची सही असल्याचंही आढळून आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

2018 मध्ये चोक्सी भारतातून फरार

पीएनबी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर मेहुल चोक्सीचं नाव चर्चेत आलं. याच काळात चोक्सी भारत सोडून गेला. आरोपांआधीच चोक्सीने भारतातून पळण्याची तयारी केल्याचाही आरोप झालाय. 2017 मध्ये चोक्सीने एंटीगा अँड बारबुडाचं नागरिकत्व घेतलं होतं.

चोक्सीकडून अपहरणाचा आरोप

दरम्यान, मेहुल चोक्सीने आपलं अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. एंटीगा आणि बारबुडाचे पोलीस प्रमुख एटली रॉडने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, “अपहरणाचा दावा केवळ मेहुल चोक्सीचे वकीलच करत आहेत. पोलिसांकडे याचे कोणतेही पुरावे नाहीत (Mehul Choksi Current Status). डोमिनिका पुोलिसांनी या अपहरणाच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. चोक्सीला डोमिनिका नेण्यात एंटीगा पोलिसांचा कोणताही सहभाग नाही.” मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत. (mehul choksi wife preeti choksi came under ed radar)

संबंधित बातम्या:

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्यानेच कारवाई नाही; मुश्रीफ यांचं धक्कादायक विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ‘मेहुलभाई, मेहुलभाई’ बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? : नवाब मलिक

(mehul choksi wife preeti choksi came under ed radar)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.