Mira Road Murder : सरस्वतीच्या शरीराचे तुकडे करणाऱ्याला ‘तो’ गंभीर आजार; म्हणून शरीर संबंध ठेवले नसल्याचा दावा

मीरा रोड हत्याकांड प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मनोज साने याने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याला एड्स असल्याचं साने याने पोलिसांना सांगितलं आहे.

Mira Road Murder : सरस्वतीच्या शरीराचे तुकडे करणाऱ्याला 'तो' गंभीर आजार; म्हणून शरीर संबंध ठेवले नसल्याचा दावा
manoj saneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 10:22 AM

मुंबई : मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुत्र्याला खायला घातले. घरातील दुर्गंधीमुळे या खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. त्याला कोर्टात हजर केले. त्याला पोलीस कोठडीही सुनावली गेली. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार चौकशी सुरू असताना मनोजने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. मनोजने त्याला एड्स असल्याचं म्हटलं आहे. एड्स असल्यानेच आपण सरस्वतीला कधी स्पर्शही केला नव्हता. तसेच ती मुलीसारखी होती म्हणूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नव्हते, असं त्याने पोलीस चौकशीत म्हटल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं आहे.

मनोजने चौकशीत गुन्हा कबूल केला असला तरी सरस्वतीची हत्या केली नसल्याचं म्हटलं आहे. त्याच्या दाव्यानुसार 3 जून रोजी सरस्वतीने आत्महत्या केली होती. तिने आत्महत्या केल्यानंतर हे सर्व प्रकरण आपल्यावर शेकेल आणि तुरुंगात जावं लागेल अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळेच त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो आत्महत्याही करणार होता, अशी धक्कादायक माहितीही उघड झाली आहे.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण घरात मृतदेहाचे तुकडेच तुकडे

सरस्वतीने आत्महत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरने तुकडे केले. छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्याने त्यातील काही तुकडे त्याने प्रेशर कुकरमध्ये शिजवले. नंतर गॅसवर ते भाजले. हे तुकडे सहज फेकता यावेत म्हणून त्याने हे कृत्य केलं. त्याने हे तुकडे बादली, टब, कुकर आणि किचनमधील भांड्यात ठेवले होते. त्याने सरस्वतीच्या देहाचे इतके तुकडे केले की पोलीस त्याची गनतीही करू शकत नव्हते, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

म्हणून एड्स झाला

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सानेला महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याला एड्स असल्याचं 2008मध्ये कळलं. तेव्हापासून तो एचआयव्हीतून मुक्त होण्याचे औषधे घेत आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. तेव्हा त्याला रक्त चढवण्यात आलं होतं. त्या रक्तातूनच हा आजार झाला असावा असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे.

तो तिला गणित शिकवायचा

त्याची लिव्ह इन पार्टनर स्वभावाने अधिकच पजेसिव्ह होती. मनोज उशिराने घरी यायचा. त्यामुळे त्याचं बाहेर लफडं सुरू असल्याचा तिला संशय होता, असं सांगतानाच सरस्वतीला इयत्ता दहावीची परीक्षा द्यायची होती. त्यामुळे मी तिला गणित शिकवत होतो, असं त्याने म्हटलं आहे. त्याने सरस्वतीच्या शाळेतील अॅडमिशनचे पेपरही पोलिसांना दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.