मुंबई : मोबाईल गेम खेळण्यावरून भावासोबत वाद झाल्यामुळे 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध पिऊन या मुलीने रागात आपल्या भावासमोर आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. (mumbai 16 year old girl committed suicide because clash with brother over playing a mobile game)
मिळालेल्या माहितीनुसार समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एक 16 वर्षीय मुलगी आपल्या भावासोबत मोबईलवर गेम खेळत होती. यावेळी गेम खेळत असताना या मुलीचे आपल्या भावासोतब किरकोळ कारणामुळे भांडण झाले. भांडणानंतर राग अनावर झाल्यामुळे ही मुलीगी जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेली. तसेच उंदीर मारणारे औषध घेऊन ती घराबाहेर आली. त्यानंतर रागाच्या भरात या मुलीने लहान भावासमोर रॅटोल हे औषध पिले.
ही घटना घडल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. मुलीच्या आई-वडिलांनी तसेच शेजाऱ्यांनी या मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या मुलीचे प्राण वाचू शकले नाही. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय संतोष खर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच कुटुंबीयांची चौकशी केली. या घटनेचा तापस पोलीस करत आहेत. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास मुलीचा शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. रागामुळे 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक करण्यात येत आहे.
इतर बातम्या :
अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
मुंबई एपीएमसीत नाल्यामध्ये निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे, परिसरात एकच खळबळ
भारतीयांच्या मनात विशेष स्थान, Ford च्या ‘या’ टॉप 5 गाड्या लोक विसरु शकणार नाहीत#Ford #FordIndia https://t.co/GsCPAywd3Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2021
(mumbai 16 year old girl committed suicide because clash with brother over playing a mobile game)