तस्करीसाठी आणलेले सोनं कुठे लपवलं, पाहून बसेल धक्का, मुंबई विमानतळावर दोघांना अटक
सोने पेस्टच्या स्वरुपात अंडरगारमेंटमध्ये लपवून आणले होते. मात्र कस्टम विभागाच्या अधिकांऱ्यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. या प्रकरणात दोघांना विमातळावरच पकडण्यात आलं. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)सीमा शुल्क (Customs) विभागाने मोठी कारवाई केली आहे. तस्करीसाठी आणलेले अडीच किलो सोने (gold) कस्टम अधिकाऱ्यांनी (Customs officer) जप्त केले आहे. हे सोने पेस्टच्या स्वरुपात अंडरगारमेंटमध्ये लपवून आणले होते. मात्र कस्टम विभागाच्या अधिकांऱ्यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. या प्रकरणात दोघांना विमातळावरच पकडण्यात आलं.
On 22-23 Jan Mumbai Airport Customs intercepted two foreign nationals in two separate cases and seized 90,000 USD concealed in pages of books and over 2.5 Kg Gold in paste form concealed in undergarment respectively. Both the passengers have been arrested. pic.twitter.com/4XvLSJ7DXp
हे सुद्धा वाचा— Mumbai Customs-III (@mumbaicus3) January 24, 2023
मुंबईच्या कस्टम विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कस्टम विभागाने म्हटले आहे की, परदेशावरुन येणाऱ्या दोन व्यक्तींवर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्या दोघांची तपासणी केली असता डॉलर व सोने मिळून आले. २२ आणि २३ जानेवारी रोजी कस्टम अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन परदेशी नागरिकांना अटक केली.
आरोपींनी पुस्तकात लपवून ९० हजार USD आणले होते. सीमा शुल्क विभागाने त्याचा व्हिडिओ जारी केला आहे. या दोघांकडे असलेल्या पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले ९० हजार डॉलर जप्त केले. तसेच अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले पेस्ट स्वरूपातील अडीच किलो सोने जप्त केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी हे दोन्ही नागरिक कुठून येत होते, त्याची नावे काय, याची माहिती दिली नाही. आता या दोघांच्या चौकशीतून या प्रकरणाची धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सीम शुल्क विभाग करत आहे.