Video : ‘गाडीपेक्षा जीव महत्त्वाचाय!’ आग लागलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या मालकाशी जेव्हा मुख्यमंत्री संवाद साधतात…

Toyota Fortuner कारला जेव्हा आग लागली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही ताफा याच उड्डाणपुलावरुन रवाना होत होता. कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरले. त्यांनी कारचालकाची विचारपूस केली. त्यांच्याशी मुख्यमंत्री बोलले.

Video : 'गाडीपेक्षा जीव महत्त्वाचाय!' आग लागलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या मालकाशी जेव्हा मुख्यमंत्री संवाद साधतात...
पाहा, काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 11:09 AM

मुंबई : मुंबई एअरपोर्टजवळ (Mumbai Airport) एका आलीशान फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारने सोमवारी मध्यरात्री पेट घेतला. नेमक्या याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने जात होता. वाटेत कुणाची तरी कार जळतेय, हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे, असं म्हणत कारचालकाला धीर दिलाय. गाडी आपण नवीन घेऊ, पण जीव जास्त महत्त्वाचा आहे, असं त्यांनी कारमध्ये असलेल्यांना म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्री पुढे रवाना झाले. यावेळी कारचालकानेही मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केल्यानं त्यांचे आभार मानलेत.

नेमकं काय घडलं?

मुंबई विमानतळावर एअरपोर्ट समोर असलेल्या उड्डाणपुलावर फॉर्च्युनर कार जात होती. यावेळी अचानक फॉरर्च्युनर कारने पेट घेतला. उड्डाणपुलावर पहिल्या लेनमध्ये असलेल्या या कारने पेट घेतल्यामुळे हायवेवर एकच खळबळ उडाली होती. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. या कारमध्ये असलेल्यांचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय.

हे सुद्धा वाचा

कारमध्ये आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर कारचालकाने गाडी थांबवली आणि ते लगेचच खाली उतरले. पण बघता बघता गाडीने पेट घेतला. भररस्त्यात मध्यरात्री अग्नितांडव कारचालकाने अनुभवलं. महागडी कार डोळ्यांदेखत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं कार चालक हवालदिल झाला होता.

या आगीमध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अखेर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी लगेचच अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. पण तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

महत्त्वाचं म्हणजे कारला जेव्हा आग लागली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही ताफा याच उड्डाणपुलावरुन रवाना होत होता. कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरले. त्यांनी कारचालकाची विचारपूस केली. त्यांच्याशी मुख्यमंत्री बोलले. कार जळत असल्याचं पाहून मालकाला झालेलं दुःख समजून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला.

पाहा व्हिडीओ :

कार जवळ जाऊ नका, काळजी घ्या. जीव जास्त महत्त्वाचा आहे. कार दुसरी घेता येईल, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी कार चालकाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस यंत्रणेनं कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी वाहतूक रोखली होती. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे फॉर्च्युनर कारला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण याबाबतचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

पाहा LIVE घडामोडी :

आलीशान गाड्यांच्या सुरक्षेवर सवाल

आलीशान आणि महागड्या गाड्यांच्या सुरक्षेाबाबत आता यानिमित्ताने शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. नुकताच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. मर्सिडीज कारमधून जात असताना त्यांचा मृत्यू झाल्यानं या आलीशान कारच्या सुरक्षेवर शंका घेतली जात होती. त्याआधी फोर्ड एन्डेव्हर कारमधून मुंबईला येत असताना विनायक मेटे यांची गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातग्रस्त झाली होती. या भीषण अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनानंतर आता टोयोटा कंपनीची आलीशान कार फॉर्च्युनरला आग लागल्याची घटना समोर आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.