Suresh Pujari: छोटा राजनचा हस्तक सुरेश पुजारी विरोधात मुंबई एटीएसकडून नवीन गुन्हा दाखल
अलीकडेच मुंबईतील एका व्यावसायिकाने एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये सुरेश पुजारी यांने फोन करून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा त्यांनी केला होता. सुरेश पुजारीला मुंबई एटीएसच्या विक्रोळी युनिटने अटक करून न्यायालयात हजर केले.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि रवी पुजारी यांचा जवळचा हस्तक सुरेश पुजारी विरोधात मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (Mumbai ATS) नवा गुन्हा दाखल केला आहे. एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून पुजारी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणाचा दहशतवादाशी संबंधित अँगल आहे का याचाही तपास करत आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, रवी पुजारीला गेल्या वर्षी 15 डिसेंबरला फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले होते. पुजारीला सध्या 11 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुजारीने व्यावसायिकाकडून घेतलेली रक्कम कोणत्या दहशतवादी कारवायांसाठी वापरली आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत.
मुंबई एटीएसच्या विक्रोळी युनिटने अटक सुरेश पुजारीला केले अटक
अलीकडेच मुंबईतील एका व्यावसायिकाने एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये सुरेश पुजारी यांने फोन करून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा त्यांनी केला होता. सुरेश पुजारीला मुंबई एटीएसच्या विक्रोळी युनिटने अटक करून न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुरेश पुजारी हा मुंबई आणि कर्नाटकात खंडणीचा व्यवसाय चालवायचा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 डिसेंबर 2021 रोजी तो दिल्ली विमानतळावर उतरताच इंटेलिजन्स ब्युरो आणि सीबीआयने त्याला आपल्या ताब्यात घेतले. यानंतर मुंबई एटीएससह अनेक तपास यंत्रणांनी चौकशी करून खंडणी वसुल केल्याच्या आरोपाचा तपास केला. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 2017 आणि 2018 मध्ये मुंबई आणि ठाणे पोलिसांनी सुरेश पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. अखेर फिलिपाइन्समध्ये याला अटक करण्यात आली. गँगस्टर सुरेश पुजारी हा मुंबई आणि कर्नाटकात खंडणीचा व्यवसाय चालवत होता. (Mumbai ATS files fresh case against Chhota Rajan’s accomplice Suresh Pujari)
इतर बातम्या
दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक; कुरार पोलिसांची कामगिरी