रिक्षा चोर कल्लू दादाला ऑटो रिक्षासह पोलिसांनी घातल्या बेड्या! ‘अशी’ करायची चोरी

| Updated on: Dec 09, 2022 | 11:08 AM

कांदिवली येथील समता नगर पोलिसांची मोठी कारवाई! रिक्षा चालक, रिक्षा चोर ते कल्लू दादा,

रिक्षा चोर कल्लू दादाला ऑटो रिक्षासह पोलिसांनी घातल्या बेड्या! अशी करायची चोरी
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शेकडो रिक्षा चोरून वसई नालासोपारा येथे भाड्याने घेऊन जाणाऱ्या आणि स्वत: ऑटो चालवणाऱ्या अशा रिक्षा चोराला अटक करण्यात आलीय. मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव कल्लू असं आहे. कल्लूविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात ऑटो रिक्षा चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आतापर्यंत कल्लूकडून 5 चोरीच्या रिक्षा जप्त केल्या आहेत. या रिक्षांची किंमत सुमारे 3 लाख 5 हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव अरशद शेख उर्फ कल्लू असं आहे. पोलिसांच्या चौकशीतून या रिक्षा चोराच्या बाबत धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. हा चोर नालासोपारा परिसरात चोरीच्या रिक्षा भाड्याने चालवायला देत असे, अशी माहिती समोर आली आहे.

ज्यावेळी रिक्षा चालक रिक्षा पार्क करुन अन्न खाण्यासाठी जायचे तेव्हा कल्लू चावीशिवाय ऑटो रिक्षा सुरु करुन पळ काढत असे. अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अखेर सापळा रचून कल्लू याला बेड्या ठोकल्या आहेत. समता नजर पोलिसांनी रिक्षा चोर कल्ली याच्या लक्ष्मी नगर परिसरातून अटक केलीय.

समता नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरशद शेख उर्फ कल्लू हा स्वतः रिक्षा चालवायचा. रिक्षा तुटल्यावर ती फेकून देऊन पुन्हा तो रिक्षा चोरी करत असे, असंही पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. आता या चोरावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत त्याची कसून चौकशी केली जातेय.