Marathi News Crime Mumbai crime Mumbai Best bus number 326 accident in Goregaon watch horrifying cctv video in which bus hits auto rikshaw still rikshaw driver survived
Video : बेस्ट बसचा वर्स्ट अपघात! रिक्षाला फरफटवलं, टेम्पोला ठोकलं, तरिही रिक्षावाला दोन पायांवर उभा, थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
Goregaon Best Bus Accident Video : शिवसाही प्रकल्प दिंडोशी वरुन कुर्ल्याकडे जात असताना बस क्रमांक 326 चा अपघात झाला.
मुंबई : बेस्ट बसचा अंगावर काटा आणणारा अपघात मंगळवारी समोर आला. या अपघातामध्ये बेस्ट बसने (Best Bus Accident) रिक्षाला अक्षरशः फरफटत नेलं. टेम्पोलाही धडक दिली. मात्र काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातामध्ये, ज्या रिक्षाला बेस्ट बसने चिरडलं, त्या रिक्षाचा चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (Mumbai Accident CCTV Video) कैद झाला. बेस्ट बस चालकाने दिलेल्या धडकेमुळे घडलेल्या या अपघाताचा थरारक व्हिडीओ पाहून या अपघाताची तीव्रता किती भयंकर होती, याचा अंदाज बांधता येईल. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. बेस्ट बस (Mumbai Best Bus News) क्र. 326 या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. बस थांबवता येणं अशक्य झाल्यामुळे अखेर बसने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या रिक्षाच चालकही होती. याच रिक्षाला फरफटत बेस्ट बसने टेम्पोलही ठोकर दिली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. एकूण 5 जण या अपघातामध्ये जखमी झालेत. या अपघातामध्ये वाटेत असणाऱ्या साईबाबा मंदिरासह खाली मारिअम्मा मंदिराचंही नुकसान झालंय.
पाहा व्हिडीओ :
#WATCH | Mumbai: Four people were injured after a bus hit them. The accident took place due to brake failure of the bus which was going from Santosh Nagar to Kurla. Dindoshi police has registered a case and started further investigation.
या अपघातामधील जखमी झालेल्या बस चालक आणि वाहकासह रिक्षा चालकावर जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर जखमी प्रवाशांवर वेदांत खासगी रुग्णालय, दिंडोशी इथे उपचार सुरु आहेत.
थोडक्यात मोठा अनर्थ टळला
शिवसाही प्रकल्प दिंडोशी वरुन कुर्ल्याकडे जात असताना बस क्रमांक 326 चा अपघात झाला. दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली. संतोष नगर, बीएमसी कॉलनी, डी वॉर्ड समोर शेजारी असलेल्या मंदिरावर धडक देऊ ही बस अपघातग्रस्त झाली. या बसने रिक्षाला फरफटत नेल्यानंतर काही काळ आजूबाजूच्या लोकांनाही नेमकं झालंय काय, हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये काही लोकंही या बसच्या मागे धावत असल्याचं दिसून आलंय. दरम्यान, बेस्ट बसच्या झालेल्या वर्स्ट अपघातातून थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.