मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) नाकावर टिच्चून बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडीओ (Mumbai Bike Stunt viral Video) व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एका बाईकवरुन तब्बल सहा जण प्रवास करताना दिसतेय. रमनदीप सिंह होरा या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी टॅग करत या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलीस या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती मिळतेय. या तरुणांवर आता कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. भर ट्रॅफिकमध्ये (Mumbai Traffic) सहा हुल्लजबाज तरुणांची स्टंटबाजी समोर आली आहे. खरंतर नियमानं एका बाईकवर दोघांना जाण्यास परवानगी आहे. बाईकवर तिसरा व्यक्ती असेल, तर लगेचच वाहतूक पोलीस अशा बाईकस्वारांवर कारवाई करतात. पण इथं तीन नव्हे, तर तब्बल सहा जण एकाच बाईकवरुन प्रवास करता कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Heights of Fukra Panti 6 people on one scooter @CPMumbaiPolice @MTPHereToHelp pic.twitter.com/ovy6NlXw7l
हे सुद्धा वाचा— Ramandeep Singh Hora (@HoraRamandeep) May 22, 2022
रमनदीप होरा नावाच्या एका ट्विटर युजरने 22 मार्च रोजी रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. अवघ्या पाच सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सहा जण बाईकवर स्वार झालेत. 55 हजारपेक्षा जास्त लोक हा व्हिडीओ पाहून झालेत.
एका स्कूटीवर पाच जण बसले असल्याचं दिसतंय. तर एकाला सगळ्यात मागे बसलेल्या तरुमानं खांद्यावर बसल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. स्कूटीवर बसलेल्या एकानंही हेल्मेट घातलेलं नाही. रमनदीप होरा यांनी कारमधून मोबाईलवर रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ शेअर केलाय.
दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेत हा व्हिडीओ कुठल्या परिसरातला आहे, याचीही माहिती घेतली. सदर व्हिडीओ अंधेरी पश्चिमेच्या स्टार बाजार परिसरातूल असून आता सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीनं पोलिसांकडून तपास केला जातोय. सध्या या सहा जणांना शोध पोलीस घेत असून पोलिसांकडून या स्टंटबाज तरुणांवर काय करावाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.