मुंबई : मुंबई (Mumbai Crime News) एकाला देशी बनावटीचं पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण तीन देशी बनावटीच्या पिस्तुलासह (Desi Made Pistols) 9 जिवंत काडतुसं पोलिसांनी हस्तगत केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. मुंबई (Mumbai News) क्राईम ब्रांचच्या युनिट 11 या कांदिवलीच्या पथकानं गोरेगावच्या बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटकेची कारवाई केली. छामेमारी करत ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीच्या गोरेवाव येथील घरावर छापा टाकण्यात आला. 27 वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याची आता कसून चौकशी केली जातेय.
मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 कांदिवलीच्या पथकाने बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली. एका आरोपीच्या घरावर छापा टाकून तीन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह 9 जिवंत काडतुसे जप्त छापेमारीत जप्त करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाला उत्तर प्रदेशातून एक व्यक्ती काही शस्त्रांसह मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या क्रांती चाळ, भगतसिंग नगर, गोरेगाव पश्चिम येथील घरावर छापा टाकला. आरोपीकडून सॅमसंगच्या बॅगेत ठेवलेली तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि 9 जिवंत काडतुसे यावेळी जप्त करण्यात आली. शंकर तुळशीराम भर उर्फ भारद्वाज असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे वय 27 वर्षे आहे.
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बांगूर नगर पोलिस ठाण्यात दोन आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. सध्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी तुलसीराम याला पोलीस ठाण्यात पाठवले आहे. शस्त्र कायद्यांतर्गत अटक करून आरोपीला पुढील तपासासाठी बांगूर नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
दुसरीकडे, बांगूर नगर पोलीस आता आरोपीकडून मुंबईत एवढी शस्त्रे का आणली आणि त्यामागचा हेतू काय, याचा तपास करत आहेत.