Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक

जप्त केलेल्या नोटांचा दर्जा मध्यम असून, बाजारात सहज नेता येईल. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून या नोट छापण्यासाठी कोणत्या मशिनचा वापर केला जातो ? त्यांच्यासोबत या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे ? याचा पोलीस तपास करीत आहेत.

Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक
मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 9:38 PM

मुंबई : मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने दहिसर चेक नाक्या(Dahisar Check Naka)वर मोठी कारवाई करत 2000 रुपयांच्या सात कोटींच्या बनावट नोटा(Fake Notes) जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून 7 मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, 28170 रुपये रोख आणि एक लॅपटॉपही हस्तगत केले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस चौकशीत या नोटा दिल्लीहून मुंबईत आणल्याचे आरोपींना सांगितले. (Mumbai Crime Branch seizes Rs 7 crore counterfeit notes, arrests seven accused)

अंधेरीहून दहिसरमध्ये नोटा आणण्यात येत होत्या

अंधेरीहून दहिसरला एक आंतरराष्ट्रीय टोळी बनावट नोटांचा व्यापार करण्यासाठी येणार असल्याचे माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार पोलिसांचे एक पथक नॅशनल पार्क येथे तर दुसरे पथक दहिसर टोलनाक्याजवळ तैनात केले. ही टोळी ओला गाडीतून नोटा घेऊन येत होती. पोलिसांना गाडीची खात्री पटताच पोलिसांनी गाडीचा पाठलाग करुन आरोपींसह बनावट नोटा ताब्यात घेतल्या. याप्रकरणी चार आरोपींना दहिसर चेकनाक्यावरुन तर तिघांना अंधेरीतून अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई गु्न्हे शाखा युनिट 11 चे पोलीस अधिकारी विनायक चव्हाण यांनी दिली.

याप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत आहेत

जप्त केलेल्या नोटांचा दर्जा मध्यम असून, बाजारात सहज नेता येईल. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून या नोट छापण्यासाठी कोणत्या मशिनचा वापर केला जातो ? त्यांच्यासोबत या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे ? याचा पोलीस तपास करीत आहेत. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Mumbai Crime Branch seizes Rs 7 crore counterfeit notes, arrests seven accused)

इतर बातम्या

Jharkhand Crime : ये दोस्ती हम नही छोडेंगे… सोबतच गुणगुणायचे, आयुष्यही एकत्रच संपवलं; जगावेगळ्या मैत्रीचा असा झाला करूण अंत

Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.