Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली, असा दावा एनआयएने कोर्टात केला

वाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा
Sachin Waze Mansukh Hiren Pradeep Sharma
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 4:26 PM

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी सांगितलं. (Mumbai Crime NIA claims Encounter Specialist Pradeep Sharma Sachin Waze ordered Satish Manish Soni to killed Mansukh Hiren)

NIA चा दावा काय?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी केला आहे.

हिरेनच्या हत्येनंतर आरोपी शर्मांच्या संपर्कात?

सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन हत्येत सहभाग होता. सोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही होते. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेनच्या हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत. प्रदीप शर्मा हे निवृत्त आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर मिळाली आहे. ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं.

कोर्टात काय काय झालं?

NIA – प्रदीप शर्मा यांच्या घरातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाली आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी असा प्रश्न NIA ने कोर्टात उपस्थित केला.

प्रदीप शर्मा – 1997 साली हे पिस्तुल मला मिळालं होतं. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्या पिस्तुलचे लायसन्स माझ्याकडे आहे फक्त ते मला रिन्यू करता आलं नाही पण त्याची प्रोसिजर बाकी आहे.

NIA – मनसुख हिरेनची हत्या ज्या दिवशी झाली तेव्हा वाझेने त्याला फोन करुन घोडबंदर रोडला बोलवलं होतं. त्यावेळी वाझेसोबत सुनील माने होता. दोघांसोबत मनसुख गाडीत बसला आणि त्यानंतर मनसुखला वाझे आणि माने याने इतर आरोपींकडे सोपवलं.

NIA – मनसुखला ज्या गाडीत बसवण्यात आले ती गाडी आरोपी मनीष सोनी चालवत होता आणि त्याच गाडीत आरोपी सतीश, संतोष शेलार आणि आनंद जाधव होते, ज्यांनी मनसुखची हत्या केली, असा आम्हाला संशय आहे.

NIA – आम्हाला न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी सुनील मानेची पुन्हा कोठडी हवी आहे जेणेकरून या आरोपीना समोरासमोर बसवून आम्ही चौकशी करू शकू

प्रदीप शर्मा काय म्हणतात?

दरम्यान, एनआयएने प्रदीप शर्मा यांचा यापूर्वीच जबाब नोंदवला होता. त्याच वेळी त्यांचे बँक डिटेल्स, सीडीआरही काढला होता. मात्र त्यात काहीही निष्पन्न न झाल्यामुळे त्यांना सोडलं होतं, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला.

1997 मध्ये मी शस्त्र विकत घेतलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माझा सहभाग असता, तर मी थांबलो असतो का? सचिन वाझे आणि माझा काहीही संबंध नाही. जे चार जण पकडले, त्यांना मी ओळखतही नाही. संतोष हा माझा जुना खबरी आहे. मी सेनेचा आहे, असं सांगताना प्रदीप शर्मा कोर्टात भावूक झाले.

आतापर्यंत किती जणांना बेड्या?

1. सचिन वाझे 2. विनायक शिंदे 3. रियाझ काझी 4. सुनील माने 5. नरेश गोर 6. संतोष शेलार 7. आनंद जाधव 8. प्रदीप शर्मा

संबंधित बातम्या :

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

NIA ची सर्वात मोठी कारवाई, प्रदीप शर्मा यांना अटक, आतापर्यंत किती जणांना बेड्या?

(Mumbai Crime NIA claims Encounter Specialist Pradeep Sharma Sachin Waze ordered Satish Manish Loni to killed Mansukh Hiren)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.