AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber Crime | केवायसी अपडेटच्या नावाखाली फेक फोन कॉल्स, बँक खात्यातील रक्कम लाटणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेड्या

विलीनीकरण झालेल्या बँकेचे बनावट मेल आयडी तयार करुन लोकांची लूट करणाऱ्या दोघांचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे आरोपी बनावट मेलआयडी तयार करुन केवायसीच्या नावाखाली लोकांच्या बँक खात्यातील रक्कम लाटायचे.

Cyber Crime | केवायसी अपडेटच्या नावाखाली फेक फोन कॉल्स, बँक खात्यातील रक्कम लाटणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेड्या
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 11:05 AM
Share

मुंबई : विलीनीकरण झालेल्या बँकेचे (Bank) बनावट मेल आयडी तयार करुन लोकांची लूट करणाऱ्या दोघांचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे आरोपी बनावट मेलआयडी तयार करुन केवायसीच्या नावाखाली लोकांच्या बँक खात्यातील रक्कम लाटायचे. मात्र मुंबईतील (Mumbai Cyber Crime) कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेल पोलिसांच्या (Police) पथकाने हा प्रकार समोर आणून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विवेक सुनील सभरवाल असे पहिल्या आरोपीचे नाव असून तो 38 वर्षांचा आहे. तसेच बिरेनभाई शांतीलाल पटेल असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून, त्याचे वय 33 वर्षे आहे. या दोनाही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

मोबईल क्रमांक अपडेट करुन पैसे करायचे ट्रान्सफर

मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालाड सहकारी बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण केले जात आहे. याची माहिती आरोपींना मिळाली होती. या आरोपींनी बँकेच्या एका खातेदाराला फोन करून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. तसेच ईमेल आयडीवर त्याचे संपूर्ण कागदपत्रे मागवले. यामध्ये स्वाक्षरी असलेल्या कागदपत्राकंडे आरोपींचे लक्ष होते. असे कागदपत्रं या आरोपींनी जपून ठेवले. त्यानंतर खातेदाराचे कागदपत्र घेतल्यानंतर आरोपींनी खातेदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या जागी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून बँकेत कागदपत्रासह मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज ईमेल करून घेतला. मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर इंटरनेट बँकिंग सुरू करून तक्रारदाराच्या खात्यातून आरोपींनी 9 लाख रुपये ट्रान्सफर केले.

9 मोबाईल फोन, 69 हजारांची रोकड जप्त 

हा प्रकार समोर येताच, बँकेच्या ग्राहकाने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर कांदिवली पूर्व समतानगर सायबर सेलने दोन आरोपींना अटक केली. विवेक सुनील सभरवाल असे पहिल्या आरोपीचे नाव असून तो 38 वर्षांचा आहे. तो कर्ज देणारा एजंट म्हणून काम करतो. सायबर पोलिसांनी त्याला दिल्ली येथून अटक केली आहे. तर बिरेनभाई शांतीलाल पटेल असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून, त्याचे वय 33 वर्षे आहे. त्याला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आले असून, त्याच्याकडून पोलिसांनी 9 मोबाईल फोन, 69 हजारांची रोकड आणि सरकारी कागदपत्रे जप्त करण्यात आल आहेत.

चोरी नेमकी कशी करायचे ?

विलीन झालेल्या नवीन बँकेच्या नावाने आरोपी बनावट ईमेल आयडी तयार करायचे. नंतर त्या बँकेच्या खातेदारांना केवायसी अपडेटसाठी कॉल करायचे. त्यानंतर बँकेच्या नावाने बनावट ईमेल आयडी बनवून खातेदारांची संपूर्ण कागदपत्रे मिळवायचे. खातेदारांची सही असलेली कागदपत्रेही आरोपी ठेवून घ्यायचे.नंतर खातेदाराच्या कागदपत्र आणि स्वाक्षरीच्या आधारे आरोपी बँकेला ईमेल करून त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करायचे. तसेच ऑनलाइन बँकिंग सुरू करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन घ्यायचे. सध्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांनी केवायसीच्या नावाखाली आणखी किती लोकांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या :

Mumbai Crime | कामाहून परतताना 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 जणांविरोधात गुन्हा, दोघे अल्पवयीन

Nagpur Crime | अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय?

Nashik Crime | प्रांतअधिकाऱ्याची महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी; प्रशासनाने घडवली चांगलीच अद्दल!

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.